China : एक वर्षाच्या प्रयत्नानंतर सुद्धा राहिली नाही प्रेग्नंट, डॉक्टरांकडे गेल्यावर समजले जन्मताच आहे पुरुष

बिजिंग : मातृत्वाचा अनुभव घेणे जवळपास प्रत्येक महिलेची इच्छा असते, विवाहानंतर मुलगी आई बनण्याचे स्वप्न पहाते, परंतु काहींसाठी हा प्रवास सोप नसतो. मात्र, आता तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की, महिलांसाठी आई होणे जास्त अवघड नाही. चीनची एक ’महिला’ सुद्धा विवाहानंतर आई होण्याची वाट पहात होती, परंतु एक वर्षाच्या प्रयत्नानंतर सुद्धा जेव्हा ती गरोदर होऊ शकली नाही तेव्हा डॉक्टरांनी तिच्याबाबत हैराण करणारा खुलासा केला.

विवाहाच्या एक वर्षानंतरही झाली नाही आई
मीडिया रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनुसार, 25-वर्षांची विवाहित महिला पिंगपिंग (बदललेले नाव) आई होण्याची आतुरतेने वाट पहात होती. तिने मुलासाठी एक वर्षापर्यंत प्रयत्न केला परंतु गर्भधारणा झाली नाही. दरम्यान, ती दखापतग्रस्त घोट्याचा एक्स-रे घेऊन डॉक्टरांकडे गेली, परंतु तिला माहित नव्हते की डॉक्टरांना भेटल्यानंतर आपल्या पाया खालची जमीन सरकणार आहे. डॉक्टरांनी पिंगपिंगला सांगितले की, ती जन्मताच एक पुरुष आहे.

डॉक्टरांचे म्हणणे ऐकुन हादरली
डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट ऐकून पिंगपिंग आणि तिच्या कुटुंबियांची झोप उडाली. पिंगपिंगच्या एक्स-रे तून समजले की, किशोरावस्थेपासून तिच्या हाडांचा विकास झालेला नाही. तिच्यात पुरुष वाय गुणसूत्र आहे. मात्र, डॉक्टरांनी पिंगपिंगला सांगितले की, तरीसुद्धा ती जीवनभर महिला म्हणून राहू शकते. डॉक्टरांनी सांगितले की, महिला दुर्मिळ आजाराने पीडित आहे, आणि याच करणामुळे पिंगपिंगला कधीही मासिक पाळी आली नाही. ती कधीही गरोदर राहू शकत नाही.

महिलेमध्ये आहेत पुरुष गुणसूत्र
मीडिया रिपोर्टनुसार, पिंगपिंगला डॉक्टरांच्या खुलाशानंतर धक्का बसला आहे. तिला हे सत्य स्वीकारण्यास अवघड जात आहे. डॉक्टरांनुसार, पिंगपिंग एक प्रकारचा लैंगिक आजार एक्स46 ने पीडित आहे, हा असा दुर्मिळ आजार आहे, ज्यामध्ये जन्माच्या वेळी पुरुष गुणसूत्र असणार्‍या लोकांमध्ये प्रजनन अवयव अस्पष्ट, अविकसित किंवा असतच नाहीत. पिंगपिंगला जन्मताच महिला ऑर्गन होते, यासाठी तिने कधी या विषयाकडे लक्ष दिले नाही.

पीरियड येत नाहीत के समजल्यानंतर तिने अगोदरच डॉक्टरांशी संपर्क केला असता तर तिला सत्य समजले असते, याच कारणामुळे ती लग्नानंतरही गर्भधारणा करू शकली नाही. पिंगपिंगने म्हटले की, पीरियड न येणे तिच्यासाठी चिंतेचा विषय होता, परंतु लाज वाटत असल्याने तिने कधीही याबाबत चर्चा केली नाही. डॉक्टरांनी जेव्हा पिंगपिंगच्या दुखपत झालेल्या घोट्याचा एक्स-रे काढला तेव्हा त्यांना काही अविकसित हाडांच्या बाबत समजले. यानंतर जेव्हा पिंगपिंगची सखोल तपासणी केली तेव्हा ती पुरुष असल्याचे समजले. मात्र, या समस्येवर उपचार आहे.