Chiplun Flyover Bridge Broke | बांधकाम सुरू असताना उड्डाण पुलाचे गर्डर तुटले, मोठ्या आवाजामुळे नागरिकांची पळापळ

चिपळूण : Chiplun Flyover Bridge Broke | चिपळुण हद्दीतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai Goa Highway) चौपदरीकरणाअंतर्गत सर्वात मोठ्या उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजता मोठा आवाज होऊन पुलाच्या मध्यवर्ती भागातील दोन गर्डर तुटले. यावेळी भयभीत नागरिकांची पळापळ झाली. या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Chiplun Flyover Bridge Broke)

मागील महिनाभरात चिपळूण हद्दीत चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला होता. पण आता ही घटना घडल्याने पुन्हा विलंब होण्याची शक्यता आहे.

चिपळूणमधील बहाद्दूरशेख नाका येथील उड्डाण सुरू आहे. चिपळूण शहरातून हा १.८५ किलोमीटर अंतराचा उड्डाण पूल उभारला जात आहे. या उड्डाण पुलासाठी एकूण ४६ पिलर असून त्यापैकी सहाव्या पिलरपर्यंतचे काम पूर्ण होत आले आहे. (Chiplun Flyover Bridge Broke)

आता गर्डर चढविण्याचे काम सुरू केले आहे. वाशिष्ठी पुलापासून बहादूरशेख नाका दरम्यानचे गर्डरचे काम पूर्ण झाले असून नुकतेच मुख्य नाक्यावरील अवघड टप्प्यात काम सुरु होते. सोमवारी सकाळी पाचव्या पिलरच्या ठिकाणी असलेले गर्डर खचले.

यावेळी जोरदार आवाजही झाल्याने नागरिकांची पळापळ झाली. पुलाच्या परिसरातील इमारतीमधील व्यापारी
आणि रहिवाशांचीही पळापळ झाली. यावेळी कामगारांनीही तेथुन पळ काढल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
सध्या पुलाचे काम थांबवले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MP Sanjay Raut On CM Eknath Shinde | संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका; म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांना ‘समाजवाद’ शब्द माहित आहे का?’

Rohit Pawar On Ink Splash On Chandrakant Patil | शाई फेक योग्य नाही – आमदार रोहित पवार

Amol Mitkari | भंगार पुस्तकाच्या विक्रीसाठी बोरवणकर यांचे अजितदादांवर आरोप – अमोल मिटकरी

Pune Police MPDA Action | पुणे शहरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 49 वी स्थानबध्दतेची कारवाई