Pune Police MPDA Action | पुणे शहरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 49 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | खुनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे करुन खडक परिसरात दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार आझम शेख याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 49 वी कारवाई आहे. (Pune Police MPDA Action)

आझम इक्बाल शेख Azam Iqbal Shaikh (वय-25 रा. भवानी पेठ, चुडामन तालीम समोर, पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीवघेण्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न, खंडणी, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगा करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. (Pune Police MPDA Action)

आझम शेख याच्या विरोधात मागील पाच वर्षात 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई
करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन
पोलीस आयुक्तांनी आरोपीला एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने, पोलीस उपनिरीक्षक अतुल बनकर व पी.सी.बी. गुन्हे शाखा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे, पोलीस उपनिरीक्षक राजु बहिरट यांनी केली.
पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत 49 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई केली जाणार
असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MP Sanjay Raut On CM Eknath Shinde | संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका; म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांना ‘समाजवाद’ शब्द माहित आहे का?’

Amol Mitkari | भंगार पुस्तकाच्या विक्रीसाठी बोरवणकर यांचे अजितदादांवर आरोप – अमोल मिटकरी