Chitra Wagh On Supriya Sule | चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाल्या – ‘तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार का? उगाच शहाणपणाच्या गोष्टी करू नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh On Supriya Sule | पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणातील संजय राठोड यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये काल कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारले घेरले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रकरण उचलून धरणार्‍या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड (Sanjay Rathod) यांच्याविरोधात ठोस भूमिका घेतली आहे. असे असूनही या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी त्यांना डिवचल्याने वाघ यांनीही रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. (Chitra Wagh On Supriya Sule)

 

भाजपने राठोडांना क्लिन चिट देऊन आणले आहे. यामुळे माझी संजय राठोडांच्या वतीने भाजपला विनंती आहे, की त्यांनी राठोडांची, त्यांच्या पत्नीची, त्यांच्या मुलांची आणि बंजारा समाजाची माफी मागायला हवी, असे खासदार सुप्रीया सुळे यांनी म्हटले होते. यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिले आहे.

 

चित्रा वाघ यांनी एका मराठी वाहिनीशी बोलताना म्हटले की, जर राठोड यांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची, तर मग करुणा मुंडेंचे काय करायचे? तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का? त्यामुळे उगाचच शहाणपणा करण्याच्या गोष्टी करू नयेत, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावले आहे.

याबाबत चित्रा वाघ म्हणाल्या की, सुप्रिया ताई या राज्यातील खूप मोठ्या नेत्या आहेत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या होत्या.
आजही त्या तिथल्या नेत्या आहेत. मला त्यांना सांगायचे आहे, की जर राठोड यांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची,
तर मग करुणा मुंडेंचे काय करायचे? महाविकास आघाडीने, मग त्यात राष्ट्रवादी आली, काँग्रेस आली,
शिवसेना आली, तिची ज्या पद्धतने धिंड काढली, तिच्या गाडीत कशा पद्धतीने पिस्तुल ठेवण्यात आले,
तिला कशा पद्धतीने जेलमध्ये टाकण्यात आले, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे.
त्यामुळे तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का? त्यामुळे उगाचच शहाणपणा करण्याच्या गोष्टी करू नयेत.

 

Web Title :- Chitra Wagh On Supriya Sule | will you apologize to karuna munde chitra wagh ask to supriya sule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Traffic Police | हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल

 

RBI Action On Rupee Co-Operative Bank | रुपी बँकेचा RBI कडून परवाना रद्द

 

Nashik Crime | पहिल्या मजल्यावरुन पडल्याने 18 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू