Chitra Wagh | सन्मान अजित पवारांच्या बहिणीचा नाही, तर राज्यातील सर्व महिलांचा झाला पाहिजे – चित्रा वाघ

वाशिम: पोलीसनामा ऑनलाइन – कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यामुळे सध्या त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहेत. आता त्यांच्या या प्रकरणावर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील भाष्य केले आहे. सन्मान अजित पवारांच्या बहिणीचा नाही, तर राज्यातील सर्व महिलांचा झाला पाहिजे, असे चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या आहेत.

अजित पावर (Ajit Pawar) आम्हाला आदरस्थानी आहेत. त्यामुळे त्यांना सन्मान फक्त त्यांच्या बहिणीचा झाला पाहिजे, असे वाटत नसून, राज्यातील प्रत्येक महिलेचा झाला पाहिजे, असे वाटत असेल. त्याचमुळे ते या प्रकरणावर अजून काही बोलले नाहीत. मी त्यांच्यासोबत काम केलेले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत आम्हाला माहीत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्हाला नेहमीच आदर रहाणार आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

तसेच यावेळी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात मुलींचे सुधारगृह करण्याची मागणी केली आहे.
मुलींवर अत्याचार झाल्यास त्यांना अमरावती किंवा अकोल्याला न्यावे लागत असते.
तेथे नेण्यात येईपर्यंत त्यांची स्थिती अत्यंत बिकट होत जाते.
त्यामुळे आमची मागणी आहे, की बुलढाणा जिलह्यात मुलींचे सुधारगृह तयार करण्यात यावे.
त्यासंदर्भात मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत बोलणे केले आहे.
त्यांनी देखील या मागणीला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बुलढाणा जिल्ह्यात
महिलांचे सुधारगृह करण्यात येईल, असे चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

Web Title :-   Chitra Wagh | The honor should not go to Ajit Pawar’s sister, but to all women in the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी केलेली चूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुरुस्त केली आहे – जयकुमार गोरे

Riteish Deshmukh | रितेश देशमुख आणि जेनेलियाचा नवा चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला