सचिन तेंडुलकर, सौरव गांगुलीसह माजी खेळाडूंना ‘BCCI’ने खडसावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित करत भारताचे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीसह अन्य माजी खेळाडूंना सुनावले आहे. बीसीसीआयचे शिस्तपालन समितीचे अधिकारी डी के जैन यांनी हितसंबंध जपण्याच्या मुद्यावरून तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी या खेळाडूंच्या दुहेरी भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ह्यावर्षीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच सचिन तेंडुलकरने समालोचक म्हणून काम पहिले आहे. त्याच्याबरोबरच तेंडुलकर, गांगुली, हरभजन सिंग, व्हि व्हि एस लक्ष्मण हेही समालोचन करत आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमधील भूमिका सांभाळा किंवा टीव्हीवर समालोचन करा, असे बीसीसीआयने खेळाडूंना सांगितले आहे.जस्टीस लोढा समितीच्या शिफारशीनुसार बीसीसीआयच्या प्रशासनात दुहेरी हितसंबंधांना मनाई करण्यात आली आहे.. मात्र असे असताना अनेक खेळाडूंनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

सचिन तेंडुलकर हा आयपीएलमधल्या मुंबई इंडियन्सचा, तर व्हीव्हीएस लक्ष्मण हा सनरायझर्स हैदराबादचा मार्गदर्शक म्हणून सक्रिय आहेत. तर गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष, क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आणि दिल्ली कॅपिटल्स या आयपीएल संघाचा सल्लागार आहे.दरम्यान यापूर्वीही सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बीसीसीआयने हितसंबंधांसंदर्भात नोटीस बजावली होती.

आरोग्यविषयक वृत्त

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा “पायलेट्स एक्सरसाइज”

जाणून घ्या “योगा” कधी करावा

मोदी म्हणतायेत योगा करेल ” गरिबी दूर “

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु

सिने जगत

अभिनेत्री बिपाशा बसुचे ‘न्यू’ फोटो शुट, चाहत्यांना ‘अगळी-वेगळी’ भेट

‘भाईजान’ सलमान खान सोबत काम करणारा ‘हा’ अभिनेता आता करतोय ‘Food Delivery’

You might also like