Chris Rock On Will Smith Slap Controversy | विल स्मिथच्या ‘गालफटा’वर अखेर क्रिस रॉकनं तोडलं मौन; म्हणाला – ‘मी अजून विचार करतोय नक्की काय झालं होत?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Chris Rock On Will Smith Slap Controversy | नुकतंच ऑस्कर 2022 (Oscar 2022) पुरस्कार सोहळा धुमधडाक्यात पार पडला. मात्र या सोहळ्यातील एका घटनेनं पूर्ण जग हादरूण गेलं. सुप्रसिद्ध अभिनेता विल स्मिथनं (Will Smith ) कार्यक्रमामध्ये सगळ्यांसमोर क्रिस रॉकला (Chris Rock On Will Smith Slap Controversy) कानाखाली मारली. या गालफटाचा प्रतिध्वनी संपूर्ण जगानं ऐकला. गालफटात मारल्यानंतर पहिल्यांदाच क्रिसनं यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बुधवारी रात्री बोस्टनमध्ये झालेल्या त्याचा स्टॅन्डअप कॉमेडी शो मध्ये क्रिस (Chris Rock) पहिल्यांदाचं विल स्मिथच्या मारलेल्या प्रकरणाबद्दल बोलला आहे. या शो मध्ये त्यानं पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये एन्ट्री केली. तसेच प्रेक्षकांनी क्रिसला 3 मिनिटं स्टॅन्डिंग ओव्हेशन दिले (Chris Rock Stand Up Comedy Show). तसेच या नंतर त्यानं या शो मध्ये सर्वात वादग्रस्त विषयाचा उल्लेख केला आहे. क्रिसनं प्रथमच ऑस्कर मध्ये झालेल्या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे

सोशल मीडियावर क्रिसचा (Chris Rock Viral Audio) ऑडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये क्रिस प्रेक्षकांना म्हणाला, ‘जे काही घडलं, त्याबद्दल बोलायला माझ्याकडे मूर्खपणा नाही. म्हणूनच तुम्ही ते ऐकण्यासाठी इथे आले असाल, तर माझ्याकडे एक संपूर्ण कार्यक्रम आहे, जो मी या आठवड्यात शेवटी लिहिला होता. मी अजूनही विचार करत आहे, नक्की काय झालं. तसेच नंतर कोणत्या तरी प्रसंगी मी या गोष्टीवर बोलेन. ते सिरियस आणि विनोदी असेल.’

 

दरम्यान, विल स्मिथनं (Wil Smith – Chris Rock)
गालफटात मारल्यानंतर क्रिसच्या आयुष्याचं चांगलंच सोनं झालं आहे.
कारण या घटनेनंतर क्रिसच्या कॉमेडी शोच्या तिकिटांच्या किमंतीनं चांगलीच मोठी उडी मारली आहे.
पूर्वी त्याचा कार्यक्रामाचे तिकिट 3,500 इतके होते,मात्र या घटनेनंतर तब्बल त्याचा तिकिटाची किंमत 31,274 इतकी झाली आहे.

Web Title :- Chris Rock On Will Smith Slap Controversy | chris rock first reaction after will smith oscars slap controversy


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Government Relaxes Covid Restrictions | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात कोरोनावरील सर्व निर्बंध हटवले, जाणून घ्या मास्क मुक्तीबाबत काय झालं ?

Skincare Tips | उन्हाळ्यात चेहरा स्वच्छ आणि उजळ बनवण्यासाठी ट्राय करा ‘या’ 5 गोष्टी; जाणून घ्या

Highway Land Acquisition Scam | नॅशनल हायवेजवळ जमिनी दाखवून वाटला करोडोंचा मोबदला; औरंगाबादचा उपजिल्हाधिकारी निलंबित