‘नागरिकत्व’ विधेयक : मीमी चक्रवर्ती यांच्यासह TMC चे 6 खासदार मतदानास अनुपस्थित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेतून मंजूर झाले असून आता हे विधेयक राज्यसभेत आणण्याची तयारी सुरू आहे. संसदेत या विधेयकाला कडाडून विरोध करणारे तृणमूल काॅंग्रेसचे सहा खासदार या विधेयकावर मतदानादरम्यान गैरहजर राहिले.

तृणमूल काॅंग्रेस मोदी सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा सातत्याने विरोध करत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये हा कायदा लागू होऊ देणार नाही असे अनेकदा जाहीर केले आहे.

सोमवारी या विधेयकावर सभागृहात चर्चा झाली तेव्हा तृणमूल काॅंग्रेसने त्याविरोधात मतदान केले. अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाॅं यांनी मतदान केले तर, तर मिमी चक्रवर्ती यांनी यात सहभाग घेतला नाही.

टीएमसीचे हे 6 खासदार मतदानास अनुपस्थित राहिले

1) मिमी चक्रवर्ती,
2) देव,
3) सी.एम. जतुआ (त्यांचे वय अधिक आहे, म्हणूनच पक्षाने त्यांना रात्री संसदेत उपस्थित न राहण्याची सूट दिली).
4) दिबयेंद्रु अधिकारी,
5) शिशिर अधिकारी (ममता बॅनर्जी यांचा तेथे कार्यक्रम असल्याने दोन्ही खासदार त्यांच्या मतदारसंघात होते.
6) खलीउर रहमान (कौटुंबिक कारणांमुळे ते अनुपस्थित होते).

टीएमसीचे लोकसभेत एकूण 22 खासदार आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा टीएमसीने संसदेत याचा कडाडून विरोध केला. टीएमसीचे खासदार सौगता रॉय म्हणाले की , ‘हे विधेयक घटनेच्या विरोधात आहे, कदाचित अमित शहा हे देखील सभागृहात नवीन असतील, त्यामुळे त्यांना नियमांविषयी माहिती नाही.’ तसेच टीएमसीच्या वतीने ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनीही या विधेयकाविरोधात निवेदन दिले.

Visit : Policenama.com