महापालिका आयुक्तांच्या बंगल्या समोर सफाई कर्मचाऱ्यांचा ठिय्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

कंत्राटी सफाई कामगारांचे मागील तीन महिन्यापासून थकलेले वेतन मिळावे यासाठी संतप्त कर्मचाऱ्यांनी आज (शनिवारी) पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बंगल्यासमोर ठिय्या मांडला. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0f65eff2-9d85-11e8-83eb-517d3ac758c3′]

महापालिकेत कायमस्वरुपी असलेले 1 हजार 700 सफाई कर्मचारी तर कंत्राटी तत्त्वावर 1 हजार 529 कर्मचारी कार्यरत आहेत. सात ठेकेदारांच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचारी पुरविले जातात. या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ईएसआय, पीएफ व किमान वेतन दिले जात नसल्याच्या अनेक तक्रारी या कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे नव्याने काढलेल्या निविदांमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना या सुविधा पुरविण्यासह कर्मचाऱ्यांची ‘बायोमेट्रीक’ हजेरी असण्याचा नियम, अटी व शर्तींमध्ये समावेश करण्यात आला.

काही ठेकेदारांनी या कर्मचाऱ्यांना “ईएसआय’ व “पीएफ’ सुविधा पुरवायला सुरुवात केली असून त्याचे पुरावे आरोग्य विभागाला सादर केले आहेत.  मात्र, किमान वेतन दिल्याचा पुरावा सादर करण्यासाठी ‘बँक स्टेटमेंट’ सादर न करु शकलेल्या ठेकेदारांची पालिकेने बीले रोखली आहेत. यामुळे कंत्राटी कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले. वेतनाविना कर्मचारी स्वच्छतेचे काम करत आहेत.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15c96003-9d85-11e8-a9bb-ff69e5759bcf’]

वेतन मिळाले नसल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज (शनिवारी) मोरवाडीतील महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर दुपारी एकच्या सुमारास ठिय्या मांडला. वेतन देण्यात यावे या मागणीसाठी जवळपास दीड तास कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला होता. गेल्या तीन महिन्यांपासून आम्हाला वेतन मिळाले नाही. आम्ही संसार कसा चालवायचा. ठेकेदारांनी आमचे एटीएम कार्ड देखील काढून घेतले आहेत. किमान 11 हजार वेतन असताना आम्हाला केवळ सात हजार रुपयेच वेतन मिळत असल्याचे, आंदोलक महिलांनी सांगितले. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी समजूत काढत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.