मुख्याध्यापकासह लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कोण कोणत्या गोष्टीसाठी वरकमाईचा मार्ग कसा शोधतील, याचा काही नेम नाही. आता हेच पहा एका शाळेचा मुख्याध्यापक तो काय भष्ट्राचार करणार असे आपल्याला वाटेल. पण ज्याला वरकमाई करायची तो कोणतेही कारणे काढून त्यांच्याकडे आलेल्यांसमोर अडचणी निर्माण करु शकतो आणि लाच घेतो. त्यात आता मुख्याध्यापकही मागे नाहीत. त्यांनी चक्क बदली झालेल्या महिलेला त्यांच्या सेवा पुस्तकाची प्रत आणि इतर कागदपत्रे देण्यासाठी चक्क ५ हजार रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांच्यासह लिपिकाला पकडून त्यांचा हा भष्ट्राचार सर्वांसमोर आणला आहे.

पी. एम. मुंदडे विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत पाटील ( वय ५७, रा. शिवराणा नगर, जळगाव) व लिपीक संजय कुलकर्णी ( वय ५१, रा. मंगलमूर्ती नगर, पिंप्राळा) या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. मुदंडा शाळेतच गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार महिला ही पिंंप्राळा परिसरातील पी. एम. मुंदडे विद्यालयात कार्यरत आहे. त्यांची आता तेथून लुंकड विद्यालयात बदली झाली आहे. नोकरीबाबतचे सेवापुस्तक व इतर कागदपत्रांची फाईल मुख्याध्यापक पाटील व लिपीक कुलकर्णी यांच्याकडे होती. ही कागदपत्रे देण्यासाठी वरील दोघांनी ५ हजार रुपयांची मागणी केली. यावर तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी केल्यावर त्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुरुवारी मुदंडा शाळेत सापळा रचला. या महिलेकडून पाच हजार रुपये घेताना त्यांना पकडण्यात आले.