Climate Change | लोकांना रागीट बनवतेय वाढते तापमान, जाणून घ्या कोणत्या तापमानात मूड राहतो सर्वात चांगला?

नवी दिल्ली : Climate Change | जगात यावर्षी उष्णतेने सर्व विक्रम मोडले आहेत. अमेरिकन संस्था क्लायमेट सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, कमी उत्सर्जन (Emission) असलेले देश जून ते ऑगस्ट या काळात भीषण उष्णतेने त्रस्त झाले होते. (Climate Change)

वाढत्या तापमानाचा मानव आणि प्राण्यांच्या मनावर निगेटिव्ह परिणाम होत आहे. यामुळे त्यांना जास्त राग येतो आणि ते चिडतात. अमेरिकेत केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे. (Climate Change)

अभ्यासात म्हटले आहे की, तापमान वाढल्यामुळे हिंसेच्या प्रकरणात ४ टक्के, सामुहिक हिंसेच्या प्रकरणांमध्ये १४ टक्के आणि रस्ते अपघाताचा धोका ७.७ टक्क्यांनी वाढला आहे. ऍरिझोना रिसर्च सेंटरने अभ्यासासाठी अमेरिकेतील आठ शहरांचा डेटा वापरला. संशोधकांनी सांगितले की उष्णतेचा मेंदूवर परिणाम होत आहे. जेव्हा मेंदूला पुरेसा ऑक्सिजन आणि हायड्रेशन मिळत नाही, तेव्हा परिणामी डिप्रेशन, तणाव, राग जाणवतो.

कोणत्या तापमानात मूड राहतो चांगला?
संशोधकांच्या मते, तापमानात वाढ झाल्यामुळे मानवी शरीरातील स्ट्रेस हार्मोन वाढू लागतात. स्ट्रेस हार्मोनला कोर्टिसोल असेही म्हणतात. अभ्यासानुसार, एखादी व्यक्ती १२ ते २१ डिग्री सेल्सिअस तापमानात उत्तम मूडमध्ये राहते. यावेळी तिला राग कमी येतो. वाढत्या तापमानामुळे हेट स्पीच आणि हेट टेक्स्टची प्रकरणे देखील खूप वाढली आहेत.

उष्णेतेमध्ये अशी घ्या शरीराची काळजी

  • स्वतःला हायड्रेटेड ठेवा
  • हलके जेवण करा
  • हलके कपडे घाला
  • ऊन टाळा
  • नियमित व्यायाम करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Sharad Sonawane | “लवकरच मोठी घोषणा…” शरद सोनवणेंच्या त्या फ्लेक्सची जिल्ह्यात चर्चा, तर जुन्नरकर ही म्हणतात नेमकं काय घडणार?

Pune News | शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार