Climbing Stairs | तुम्हाला जिने चढताना धाप लागते का? या पद्धतींनी मिळेल आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Climbing Stairs | धावपळीच्या आणि व्यस्त जीवनात, अनेक लोक त्यांच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. सध्याच्या युगात अस्वास्थ्यकर अन्न आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे लोक आतून कमजोर होत आहेत. यामुळेच लोक जिने चढण्याऐवजी लिफ्टचा वापर करण्यास प्राधान्य देतात, कारण दोन-चार पायर्‍या चढताच त्यांचा श्वासोच्छवास वाढू लागतो आणि हृदयाचे ठोकेही (Heart) वाढतात. (Climbing Stairs)

 

अनेकदा असे घडते की, काही जिने चढल्याबरोबरच दम लागतो, हे काही सामान्य लक्षण नाही, यामागे इतरही अनेक कारणे दडलेली असू शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरात पोषकतत्व आणि उर्जेची कमतरता. मात्र, अनेक वेळा पोषक तत्त्वे मिळाल्यानंतरही शरीराची थोडीशी हालचाल केली तरी लोक थकतात, हे अंतर्गत आजाराचे लक्षणही असू शकते. यामागील कारण निद्रानाश, मानसिक आजार आणि अशक्तपणा असू शकते, ज्यामुळे लवकर थकवा येतो. (Climbing Stairs)

 

या गोष्टींची घ्या विशेष काळजी
स्वतःच्या शरीराचे वजन सामान्यपेक्षा जास्त होऊ देऊ नका.

झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा.

दररोज पूर्ण झोप (Sleep) घ्या आणि दिवसा झोपण्याची सवय टाळा.

सकस आणि फक्त पौष्टिक आहार घ्या.

नियमित करणे खूप महत्वाचे आहे.

समस्या कायम राहिल्यास काय करावे?
हे सर्व केल्यानंतरही श्वासोच्छवासाचा त्रास कायम राहिल्यास लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हे क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमचेही लक्षण असू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Climbing Stairs | breathlessness while climbing stairs shortness of breath heart pounding solution

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eye Care Tips | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी घरगुती पद्धत, ही फळे आणि ड्राय फ्रूट्समुळे होईल जबरदस्त फायदा

 

Rain in Maharashtra | मुंबई, पुण्यासह राज्यात मुसळधार पाऊस, पुढील 8 दिवस ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

 

Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर