मकरसंक्रातीनिमित्त पदपथावरील बालकांना दिली कपडे-खेळणी

पुणे : ज्या वयामध्ये हातात पाटी-पेन्शिल असायला हवी, खेळणी हवी आहे, त्यांना ती मिळत नाही. मात्र, त्या बालकांना कटोरा घेऊन भीक मागावी लागते, ही लाजीरवाणी बाब आहे. सामाजिक जाणिवेतून त्या चिमुकल्यांना खेळणी देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला असे मत मानवतावादी समाज सेवा संघटनेचे सचिव अशोक जाधव यांनी व्यक्त केले.

पुणे शहरातील मानवतावादी समाजसेवा संघटनेच्या वतीने मगरसंक्रातीचे औचित्य साधून पुलगेट ते स्वारगेट दरम्यान पदपथावरील लहान बालकांना खेळणी, कपडे देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष अरविंद पिल्ले, कार्यकारी सदस्य मेहमुदशा भंडारी, आजिव सदस्य प्रकाश कात्रेला, रजनी दाणी, दत्ता भोसले, बाळू बारवकर, सुनील पाटेकर, रावली नंदियार आदी उपस्थित होते.