मुख्यमंत्र्यांनी विखे पाटलांसह ‘या’ काँग्रेस आमदाराच्या घरी ‘सदिच्छा’ भेट दिल्याने राजकीय चर्चेला ‘उधाण’ !

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – आषाढी एकादशीनिमित्त महापूजेसाठी पंढपुरात उपस्थित असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. यावेळेस गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, पालकमंत्री विजय कुमार देशमुख, खासदार रणजितसिंह निंबाळकर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आमदार भारत भालके भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. राज्यात कमकुवत असलेली काँग्रेस यामुळे अजूनच कमकुवत होऊ शकते.

कारखाना अडचणीत असल्यामुळे भालकेंची भाजपशी जवळीक
भालके यांचे साखर कारखाने सध्या अडचणीत आहेत, भविष्यात सरकारची आर्थिक मदत मिळाली नाही तर अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे भालके हे भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. भविष्यातील राजकीय वाटचाल सुकर करण्यासाठी आमदार भालके भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. भाजपशी जवळीक वाढविण्यासाठी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करून मंत्री झालेले काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मदत भालके घेताना दिसत आहेत. विखेंच्या मदतीने आमदार भालके त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत भाजपमध्ये प्रवेश करणार का याची खमंग चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या साखर पेरणीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने चांगलाच धसका घेतला आहे. लोकसभेत काँग्रेसचा झालेला दारुण पराभव, सक्षम नेतृत्वाचा अभाव, लोकांचा उडालेला विश्वास यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची चांगलीच दाणादाण उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अशा चाली काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला चांगल्याच महागात पडू शकतात. काँग्रेस राष्ट्रवादी पक्षातील अनेक आमदार संपर्कात असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. त्यामुळे आता कर्नाटक, गोव्यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेसला खिंडार पडणार का ? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ही सदिच्छा भेट, याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये – भालके
विशेष म्हणजे मराठा आरक्षणावरून मागच्या वर्षी आमदार भालके यांनी फडणवीसांवर टीका केली होती. इतकेच नव्हे तर महापूजेस मुख्यमंत्र्यांना अटकाव करण्याचं समर्थनही केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी एकाच वर्षात त्याच आमदारांच्या घरी जात नवीन राजकीय खेळी करत काँग्रेस पक्षात पुन्हा वादळ तयार केलंय. भालके यांनी मात्र मुख्यमंत्री पंढरपूरला आले होते त्यांना घरी बोलवलं होतं. त्यांची ही सदिच्छा भेट होती, यात लगेच राजकीय अर्थ काढणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या