CM Eknath Shinde | पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी MSRDC ला अडीचशे कोटी रुपये वर्ग, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती


मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 
पुणे (Pune) व पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील वाहतूक कोंडी (Traffic Jam) कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) रिंगरोडचे (Ring Road) काम हाती घेतले आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून 250 कोटी रुपये एमएसआरडीसीला वर्ग केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सोमवारी सभागृहात दिली. तसेच स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा (Pune Metro) सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो केंद्राला वित्तीय व तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली.

 

विधानसभेत नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या पूरक मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे-

– हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) नागपूर ते भंडारा, गोंदिया, आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे. गडचिरोली पर्यंतच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादन प्रक्रिया आणि इतर बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

– रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची पूरक मागणी प्रस्तावित केली आहे.

– पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी (Land Acquisition) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपये वर्ग केले आहेत.

– रांजनोली- मानकोली उड्डाणपुलावरील काही भागातील खड्डे बुजविण्यासठी कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला आहे. दर्जेदार कामासाठी रेडीमिक्स वापरण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

– आरे वसाहतीमधील (Aarey Colony) रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत.

– मेट्रो मार्ग ५ चा विस्तार करण्यात येणार आहे. ही मार्गिका ठाणे-भिवंडी-कल्याण पुढे शहाड – टिटवाळापर्यंत नेण्याबाबत आवश्यकतेनुसार विचार करण्यात येईल.

 

 

– एमएमआरडीएच्या (MMRDA) माध्यमातून पठाणवाडी येथील रिटेनिंग वॉलसंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल.

– मुंबई महानगरात एमएमआरडीएच्या माध्यमातून स्कायवॉक बांधण्यात आलेले आहेत. या स्कायवॉकची उपयुक्तता पाहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून आढावा घेण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी स्कायवॉकचा वापर ज्येष्ठांना करताना अडचणी निर्माण होतात, त्यासाठी सरकते जिने, अथवा उदवाहने बसवण्याचा विचार आहे.

– काही नगरपालिकांची आर्थिक परिस्थिती पाहता विकासकामे थांबणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल.

– कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवीन रस्ते डांबरीकरणाचे आणि काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

– स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा (Swargate-Katraj Subway) सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो केंद्राला वित्तीय व तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे, केंद्राच्या मान्यतेनंतर या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल, आणि निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

– खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर प्रकल्पामध्ये तांत्रिक बाबींची तपासणी करून नागपूर मेट्रोच्या धर्तीवर डबल डेकरचा समावेश करण्याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येईल.

 

 

– गोंदिया शहरात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले आहेत, त्याला मंजुरी देखील मिळाली आहे, त्यात १५५५ लाभार्थी संख्या आहे. कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात येतील.

– वसई-विरार महानगरपलिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह उघड्या गटारींवरील
झाकणे बसविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. तुटलेल्या लोखंडी,
सिमेंट झाकणांची मागणी नोंदविण्यात आली असून आतापर्यंत ५ हजारपेक्षा अधिक झाकणे बसविण्यात आली आहेत,
उर्वरित बसविण्याच्या सूचना देण्यात येतील.

– संजय गांधी निराधार योजनेच्या (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभार्थ्यांना तातडीने वेळेवर पैसे देण्याचे निर्देश देण्यात येतील.

– पुरवणी मागणीद्वारे सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व सूचनांची दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

– हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर, तातडीने करण्यात येईल.

– नगरविकास विभागाच्या सन 2022-23 वर्षाच्या सुमारे 1886 कोटी 41 लाख रुपयांच्या
मागण्या यावेळी विधानसभेत मंजूर करण्यात आल्या.

– सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या सुमारे 2400 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या.

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | 250 crore rupees to Maharashtra State Road Development Corporation
for land acquisition of ring road in Pune city

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा