CM Eknath Shinde | “साखर कारखान्यासाठी 25 किमीची अट शिथिल करण्यासाठी समिती नेमणार”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | साखर कारखाना (Sugar Factory) उभारणीसाठी सध्या 25 किलोमीटर (25 Km) हवाई अंतराची अट आहे. ही अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. (Sadabhau Khot Meeting With Chief Minister)

माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 22 मे 2023 रोजी राज्यातील शेतकरी शेतमजूर, ऊस वाहतूकदार, सरपंच परिषद यांच्या विविध प्रश्नांवर ‘वारी शेतकऱ्यांची’ अशी पायी यात्रा काढली होती. त्या अनुषंगाने राज्यातील शेतकरी, ऊस वाहतूकदार त्याचबरोबर सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह (Sahyadri State Guest House) येथे बैठक पार पडली.

साखर कारखाना उभारणीसाठी 25 किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल. तसेच ऊसदर नियंत्रक समिती देखील तात्काळ स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सहकार विभागाला दिले. शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून (Department of Industry) धोरण निश्चित केले जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडी बाजार (Sant Shiromani Sawtamali Farmers Weekly Market)
ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी. या माध्यमातून शेतकऱ्यांचा भाजीपाला, शेतमाल शहरात आणि विविध परिसरात सहजपणे पोहोचतो. नागरिकांनीही चांगल्या गोष्टी उपलब्ध होतात. त्यामुळे यातून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे. यासाठी वाहतूक परवाना आणि अनुषंगिक बाबींसाठी पणन विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. शेतमाल विक्री करताना महापालिका, नगरपरिषद, आरटीओ तसेच अन्य प्रशासन यांनी शेतकऱ्यांना कोणताही त्रास न देता पूर्णपणे सहकार्य करण्याचे आदेशही देण्यात आले.

दरम्यान, शेती पूरक व्यवसायाला ‘सिबील’ निकष लावू नये.
याबाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती एसएलबीसी या बैठकीत हा विषय घेऊन तो मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
तसेच तुकडा बंदी कायदा रद्द करून शेतकऱ्यांना गुंठ्याने जमीन विक्री करण्यास परवानगी देणेबाबतचा कायदा
लवकरच अंमलात आणण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

या बैठकीत ऊस वाहतूक दारांची ऊसतोड मजूर, पुरवठादार मुकादमाकडून होणाऱ्या फसवणूकीच्या प्रकरणांवर गांभीर्याने चर्चा झाली.
राज्यात अशा सुमारे दहा हजार प्रकरणात 400 ते 500 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती देण्यात आली.
यावर गुन्हे दाखल झालेल्या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले.

Web Title : CM Eknath Shinde | A committee will be appointed to relax the condition of 25 km for the sugar factory

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चोरट्यांनाही YAMAHA Rx 100 ची भुरळ ! पुण्यात चोरट्यांकडून 17 दुचाकी जप्त, तिघांना अटक

Ajit Pawar | अजित पवारांनी दिली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी; म्हणाले, “पाडापाडीचे राजकारण केला तर…”

Ranjitsinh Disale | बालभारतीच्या पुस्तकातून क्यूआर कोड वगळला; रणजितसिंह डिसले गुरुजी नाराज