Ajit Pawar | अजित पवारांनी दिली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी; म्हणाले, “पाडापाडीचे राजकारण केला तर…”

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | उत्तर महाराष्ट्रातील धुळे (Dhule News), जळगाव (Jalgaon) व नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांची (NCP MLA) संख्या कमी झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करून आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. पाडापाडीचे राजकारण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.

दोंडाईचा शहरातील केशरानंद नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा (Nationalist Congress Party Meeting) पार पडला. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. भाजप (BJP) जातीय दंगली घडवून महागाई, बेरोजगारी, विकासाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करत असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

जातीय दंगली घडवून पुरोगामी महाराष्ट्रात धर्मांधता पसरविणाऱ्या भाजप सरकारला सत्तेतून बाहेर करण्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार निवडून द्यावे, असे आवाहन अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

यावेळी अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारविरोधात (Shinde-Fadnavis Government) बोलताना सांगितले,
की “राज्यात शिंदे-फडणवीस सरकार ज्यावेळेस एक वर्षांपूर्वी गद्दारी करून आणले गेले.
महाराष्ट्राला यापूर्वी 50 खोके एकदम ओके, हा मुद्दा माहिती नव्हता, तो या गद्दारांनी माहिती करुन दिला.
धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आपल्या पक्षाचा एकही आमदार नाही, असे चालणार नाही. दोन्ही जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे अधिकाधिक आमदार मिळाले पाहिजे. पुन्हा एकदा हे उलट्या पायाचे सरकार आपल्याला बाजूला करायचे आहे.”

Web Title : Ajit Pawar | ajit pawar warns ncp- party workers about internal party politics in dhule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या

Biporjoy Cyclone Update | ‘बिपरजॉय’मुळे गुजरातमध्ये प्रचंड नुकसान! अनेक झाडे कोसळली; 22 लोक जखमी, तर 23 जनावरांचा मृत्यू