Ranjitsinh Disale | बालभारतीच्या पुस्तकातून क्यूआर कोड वगळला; रणजितसिंह डिसले गुरुजी नाराज

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ranjitsinh Disale | महाराष्ट्रातील शाळा गुरूवार (दि. 15) जूनपासून सुरू झाल्या आहेत. या पहिल्याच दिवशी शासनाकडून विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. पण या पुस्तकांमध्ये (Balbharati Book) क्यूआर कोड (QR Code) नाहीत. शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांच्या संकल्पनेतून शिक्षण अधिक रंजक करण्याच्या हेतूने पुस्तकांमध्ये क्यूआर कोडचा समावेश करण्यात आला होता. क्यूआर कोडमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑडिओ आणि व्हिडिओ (Audio And Video) रुपात अभ्यासक्रम शिकता येत होते. मात्र, हेच क्यूआर कोड पुस्तकातून काढल्याने त्यावर डिसले सरांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

बालभारतीच्या पुस्तकातून क्यूआर कोड काढून टाकण्यात आला असल्याने रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य शासनाने (Maharashtra Government) काढून टाकलेले क्यूआर कोड हे पुस्तकात पुन्हा छापण्यात यावेत, अशी मागणी डिसले यांनी केली. कोरोनासारख्या परिस्थितीत ज्यावेळी शाळा बंद होत्या. त्यावेळी देखील मुलांचे शिक्षण सुरु राहिले, ते केवळ क्यूआर कोड असलेल्या पाठ्यपुस्तकांमुळे, असे डिसले म्हणाले. यासाठी राज्य सरकारने एक धोरण निश्चित करावे. एकदा क्यूआर कोड छापल्यानंतर ते परत पुस्तकातून काढले जाणार नाहीत याची खातरजमी करावी लागेल, असे डिसले म्हणाले.

ADV

दरम्यान, रणजितसिंह डिसले यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, की “2016 मध्ये मी स्वतः बालभारतीला एक प्रस्ताव देऊन पुस्तकांत क्यूआर कोड समाविष्ट करण्याबाबत सुचवले होते. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व पुस्तकात हे कोड छापले होते. प्रत्येक धड्यासाठी डिजिटल कंटेंट बनवून ते क्यूआर कोडच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहचत होते.” तर यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती (Preparation of Maharashtra State Textbook) व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (Board of Curriculum Research) एक पत्रही ट्वीट केले आहे. दरम्यान, डिसले यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर क्यूआर कोडचा पुन्हा पुस्तकात समावेश करण्याच्या मागणीबाबत सरकार काही निर्णय घेणार का? हे पहावे लागेल.

Web Title :  Ranjitsinh Disale | ranjitsinh disale qr code omitted from balbharti book maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या

Biporjoy Cyclone Update | ‘बिपरजॉय’मुळे गुजरातमध्ये प्रचंड नुकसान! अनेक झाडे कोसळली; 22 लोक जखमी, तर 23 जनावरांचा मृत्यू