CM Eknath Shinde | ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बॅनरबाजी…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्यावर बेकायदा भूखंड हस्तांतरणाचे आरोप झाले होते. आता या प्रकरणाचे बॅनर ठाण्यात लावण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक चांगलेच तापले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या समोर मुख्यमंत्र्याच्या(CM Eknath Shinde) विरोधात बॅनर लावल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

‘भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का?’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. अशा स्वरूपाचे बॅनर आज सकाळी नितीन कंपनी सिग्नल आणि ठाणे महानगरपालिकेसमोर पहायला मिळाले. विशेष बाब म्हणजे या बॅनरवर कुठल्याही राजकीय पक्षाचे नाव अथवा कार्यकर्त्याचे नाव नव्हते. त्यामुळे अशा आशयाचे बॅनर नक्की कुणी लावले असावेत. याबद्दल तर्क वितर्कांना उधान आले आहे. ह्या बॅनरमधून थेट मुख्यमंत्र्यांवरच(CM Eknath Shinde) निशाना साधण्यात आल्यामुळे हे बॅनर ठाणेकरांचे विशेष लक्ष वेधत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशा स्वरूपाचे बॅनर लावल्याचे लक्षात येताच, ठाणे महानगरपालिकेने हे बॅनर तात्काळ हटवले.

यादरम्यान, अशी कामे ही डरपोक आणि हिम्मत नसलेलेच लोक करतात. रात्रीच्या अंधारामध्ये बॅनर लावायचे.
तसेच हे बॅनर कुणी लावले आहेत. हे समजले असल्याचे देखील यावेळी नरेश म्हस्के म्हणाले.
त्याचप्रमाणे दोशींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. असा इशारा देखील यावेळी बोलताना त्यांनी याप्रकरणी दोषींना दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे नगरविकास मंत्री असताना त्यांनी एनआयटीचा जवळपास ८६ कोटींचा भूखंड
हा केवळ २ कोटींना दिल्याचा आरोप त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
तसेच याप्रकरणाची ऑर्डर देखील काढली गेल्याचा आरोप त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला होता.
त्यावर न्यायालयाने त्यांच्या या निर्णयावर ताशेरे ओढले होते.
या सर्व प्रकारावर अधिवेशनादरम्यान राज्यातील विरोधीपक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता.

Web Title :- CM Eknath Shinde | banners in front of thane municipality in nit plot scam case for cm eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘हे जिवंत सरकार नाही’; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल…

MP Sanjay Raut | ‘धर्मवीर’ चित्रपटावरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला, म्हणाले – ‘हा चित्रपट…’

Maharashtra Politics Issue | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी