Sanjay Raut | ‘हे जिवंत सरकार नाही’; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील सरकार हे घटनाबाह्य असून ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचे नाही. आपण भविष्यात कोणता आदर्श निर्माण करत आहोत, हे महाराष्ट्राच्या प्रकरणातून सबंध देशासमोर जाणार आहे. (Sanjay Raut) तसेच न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून देशात ती आस्तिवात आहे किंवा नाही हे शिवसेनेच्या या खटल्यावरून सिध्द होणार आहे. असे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते. तसेच आमची बाजू न्यायाची आणि सत्याची आहे. ‘सत्यमेव जयते’ हे बिरुद तेजाने तळपणारे असेल, तर आम्हाला कायद्याच्या चौकटीतला न्याय मिळेल, असा विश्वास आज पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला.

शिवसेनेतील फूटीबाबत आज दि.१० सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, ‘सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडून आमदार पळवून नेण्यात आले. पैशांचा वारेमाप वापर करण्यात आला. गेल्या चार महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या तारखांना आम्ही सामोरं जात आहोत. संपूर्ण देशांचं लक्ष लागलेल्या निकालाबद्दल तारखांवर-तारखा पडत असून, घटनाबाह्य सरकार मिश्कीलपणे हसत आहे. महाशक्ती आमच्या पाठीशी असून, कोणतीही कारवाई होऊ शकत नाही, असं त्यांना वाटत आहे. पण, देशातील न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे.असेही यावेळी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

‘जर एखाद्या राज्यात घटनाबाह्य सरकार चालत असेल, तर ते रोखणे न्यायालयाचे काम आहे. जर घटनेनुसार हे झालं असतं. तर केव्हाच हे सरकार कोसळलं असतं. या सरकारचा मृत्यु ठरलेला आहे. कारण हा मुडद्यात फुंकलेला प्राण आहे. हे जिवंत सरकार नाही. कितीही अडथळे आले तरी हे सरकार (Shinde-Fadnavis Govt) फेब्रुवारी महिना पाहणार नाही. असे देखील संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, तपास यंत्रणांवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, वैभव नाईक,
राजन साळवी आणि नितीन देशमुखांना एसीबीने नोटीस बजावली आहे.
आम्ही ईडी आणि न्यायालयाच्या चक्रातून बाहेर पडलो आहोत.
आमच्या अनेक लोकांवर तपासाच्या तलवारी लटकलेल्या आहेत.
नागपूरच्या अधिवेशनात या सरकारमधील मंत्र्यांचे कोट्यावधींचे घोटाळे बाहेर काढले.
ते एसीबीला का दिसत नाही? असा सवाल देखील त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
आमच्या लोकांवर दबाव आणण्यासाठी चौकश्या करण्यात येत आहेत.
उद्या आमच्यावर तुम्ही देशद्रोहाचे गुन्हा दाखल करालं. देशात आणि महाराष्ट्रात सध्या काहीही होऊ शकतं.
या सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वात असुरक्षित राज्य झाले असल्याचे देखील. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले.

Web Title :- Sanjay Raut | maharashtra in unsafe state in country say sanjay raut allegation shinde government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारमधील भ्रष्टचाराचा आरोप झालेल्या मंत्र्यांवर सामनातून जहरी टीका…

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचे उर्फी जावेदबद्दल मोठे विधान; म्हणाल्या – ‘उर्फी जे करतेय, त्यात काहीच वावगं नाही’

Urfi Javed | उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं! स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत म्हणाली – ‘…चित्रा वाघ ग्रेट है’