CM Eknath Shinde | ‘बंडखोर गद्दार’ शब्दावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘त्यांना काय…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे बंडखोर नेते गद्दार असल्याचे वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंवर (Shivsena Leader Aditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पलटवार केला आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar) यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर (Rebel) गद्दार असल्याच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

 

शिवसेनेचे बंडखोर हे गद्दार आहेत. त्यांच्या रक्तात शिवसेना नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले असल्याचे सांगत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, त्यांना काय बोलायचंय ते बोलू द्या. आम्ही आमचं काम करतोय, असं उत्तर दिलं. ते पुढे म्हणाले, आम्ही बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) शिवसेना पुढे नेण्याचं काम करतोय. महाराष्ट्रातील जनतेला आमची भूमिका पटलेली आहे. म्हणूनच 50 आमदार आणि लोकसभेचे 12 खासदारांनी आमच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. यावरुन आपल्याला कल्पना आली पाहिजे की जी भूमिका आणि विचार बाळासाहेबांचे होते ते आम्ही आत्मसात केलेत, असं सांगत आपल्याकडे बहुमत असल्याचे अधोरेखित केले.

 

तसेच पुढे म्हणाले, जे युतीचं सरकार अडीच वर्षापूर्वी घडायला पाहिजे होते ते आता घडलंय. जे बाळासाहेबांना हवं होतं, जी बाळासाहेबांची भूमिका होती ती घेऊन आम्ही पुढे चाललोय.

 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आम्ही शिवसेनेच्या खासदार-आमदारांवर अंधविश्वास ठेवला. तर त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला.
जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती. आयुष्यभर त्यांच्या कपाळावर गद्दाराचा ठपका असेल,
असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. भिवंडीत शिवसेना संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde on aditya thackeray says rebels are gaddar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा