Homeताज्या बातम्याNilesh Rane | 'उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती होते, जे ठाकरे सरकारच्या नादाला...

Nilesh Rane | ‘उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती होते, जे ठाकरे सरकारच्या नादाला लागले ते…’ – निलेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचे पूत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर पुन्हा एकदा खालच्या स्तराची टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रासाठी पनवती होते, असे त्यांनी म्हटले आहे. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी यासंबंधी एक ट्विट केले आहे. यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Former Mumbai CP Sanjay Pandey) यांच्यावरील कारवाईचा सुद्धा उल्लेख केला आहे.

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक (Arrest) झाल्यानंतर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी हे ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, मुंबईचे माजी पोलीस कमिशनर संजय पांडेंसारखे जे उद्धव ठाकरे सरकारच्या नादाला लागले ते सगळे देशोधडीला लागले, उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती होते.

 

तसेच अपक्ष आमदार रवी राणा (Independent MLA Ravi Rana) यांनीही मुंबईचे माजी पोलीस कमिशनर संजय पांडे यांच्या अटकेमुळे आपल्याला ईडीच्या (ED) माध्यमातून न्याय मिळाल्याचे म्हटले आहे. पांडे यांनीच आम्हाला उद्धव ठाकरे आणि महविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) आदेशानुसार हनुमान चालिसा प्रकरणामध्ये (Hanuman Chalisa Case) कारागृहात टाकले होते, असे रवी राणा यांनी म्हटले आहे.

 

दरम्यान, संजय पांडे यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्ली न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. पांडे यांनी आपण कोणत्याही प्रकारचे फोन टॅपिंग (Phone Tapping Case) केले नसल्याचे न्यायालयाला सांगितले. पांडे यांच्या कुटुंबियांशी संबंधीत 18 कोटी रुपयांच्या संशयीत व्यवहारांबाबत ईडी तपास करत आहे.

 

2010 ते 2015 मध्ये आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड (Eysenck Securities Private Limited), इतर काही कंपन्यांपैकी एक,
यांनी कथित को-लोकेशन अनियमिततेनंतर एनएसईचे सुरक्षा ऑडिट केले होते. मार्च 2001 मध्ये पांडे यांनी कंपनीची स्थापना केली
आणि मे 2006 मध्ये त्यांनी संचालकपद सोडले आणि त्यांच्या मुलाने आणि आईने कंपनी ताब्यात घेतली.

सुरुवातीला सीबीआयने (CBI) एनएसई घोटाळ्यामध्ये 2018 मध्ये गुन्हा (FIR) दाखल करून तपास केला होता.
एजन्सीने या प्रकरणी एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) यांचा जबाब आधीच नोंदवला आहे.
रामकृष्ण तिहार तुरुंगात (Tihar Jail) आहेत. एनएसई को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी रामकृष्ण आणि
समूहाचे माजी कार्यकारी अधिकारी आनंद सुब्रमण्यम (Anand Subramaniam) यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने मार्चमध्ये अटक केली होती.
ईडीने त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या (Money Laundering) आरोपांबाबत सीबीआयच्या तक्रारीची दखल घेतली होती.

 

Web Title :- Nilesh Rane | bjp leader nilesh rane slams ex cm uddhav thackeray over sanjay pandey arrest by ed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News