CM Eknath Shinde | राज्यात मध्यावधी निवडणुका? शिंदे गटाचे पुन्हा ‘चलो गुवाहाटी’, आमदार टप्प्याटप्प्याने जाणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुन्हा एकदा गुवाहाटीला (Guwahati) जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या समर्थक आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी नुकतेच मध्यावधी निवडणुकाचे (Midterm Elections) वक्तव्य केले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे गटाचे आमदार (Shinde Group MLA) गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे.

राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसकडून (Congress) शिंदे सरकार पडणार असल्याची वक्तव्य करत आहे. शिंदे गट गुवाहाटीला जाणार असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. बंडानंतर शिंदे गट आधी सुरत आणि तिथून गुवाहाटीला गेला होता. त्यानंतर शिवसेनेतील काही आमदार आणि मंत्री गुवाहाटीला जाऊन शिंदे गटात सामील झाले होते. यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सत्ता स्थापनेचा दावा करत कामाख्या देवीचे (Kamakhya Devi) आमदारांसह दर्शन घेतले होते. यावरुनही मोठा वाद झाला होता.

सत्तास्थापनेच्यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपण पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे सांगितले
होते. या दौऱ्याची तयारी आता सुरु झाली आहे. शिंदे यांचे काही कार्यकर्ते गुवाहाटीला पोहोचले असून दौऱ्याची
रूपरेषा ठरवत आहेत. तसेच शिंदे गटाच्या काही आमदारांना देखील जबाबदारी दिली आहे. हा दौरा यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येत आहे. त्यामुळे हे आमदार टप्प्याटप्प्याने गुवाहाटीला जाणार आहेत.

दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल,
पोलीस आयुक्त अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांना भेटणार आहेत.
या दौऱ्यात कामाख्या देवीच्या मंदिरात विशेष पूजेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शिंदे गटाचे सर्व आमदार देखील अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
प्रसारमाध्यमांशी औपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौऱ्याची माहिती दिली.

Web Title :-  CM Eknath Shinde | cm eknath shinde preparing to go to guwahati again for kamakhya devi mla will go in

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Andheri East Bypoll Result 2022 | धनुष्यबाण गेला, पण मशाल धगधगली, 15 व्या फेरीअखेर ऋतुजा लटकेंची मोठी आघाडी

Devendra Fadnavis | राज्यसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली जादा मतं कोणाची?, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

Pune Police Inspcector Suspended | पुणे शहर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक निलंबीत, जाणून घ्या कारण