CM Eknath Shinde | राज ठाकरे, वर्षा गायकवाड CM शिंदेंच्या भेटीसाठी ’वर्षा’वर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सध्या विविध पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरू केल्याचे दिसत आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ’वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीडतास दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर ताबडतोब काँग्रेस (Congress) नेत्या आणि माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) मुख्यमंत्र्यांना भेटल्या.

 

ADV

वर्षा गायकवाड यांनी देखील शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. शालेय शिक्षण विभागातील काही प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांची (Eknath Shinde) भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. तर राज ठाकरे आरोग्यविषयक प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कारण ठाकरे यांच्या भेटीवेळी शिंदें यांच्यासोबत राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) हे सुद्धा उपस्थित होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले.

 

अचानक झालेल्या ठाकरे-शिंदे भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
या भेटीत आरोग्यासह राजकीय विषयावरही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East by-Election) मनसे भाजपाला (BJP) पाठींबा देणार किंवा
नाही याविषयी सुद्धा चर्चा झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title :- CM Eknath Shinde | former education minister varsha gaikwad meets cm eknath shinde after raj thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Women Asia Cup 2022 | आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवत टीम इंडियाने केला ‘हा’ पराक्रम

Nilesh Rane | निलेश राणेंची जीभ पुन्हा घसरली, भास्कर जाधवांना म्हणाले बिनकामाचा बैल, जयंत पाटील, अजित पवारांवर केली टीका

Chitra Wagh | कोणी जर मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर…, चित्रा वाघ यांचा इशारा