CM Eknath Shinde Group MLA | शिंदे गटाच्या आमदाराचे खळबळजनक विधान; म्हणाले – ‘एकनाथ शिंदे यांचे एन्काऊंटर केले जाणार होते’

मुंबई : CM Eknath Shinde Group MLA | शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी अतिशय खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय गायकवाड यांनी पत्रकारांना सांगितले की, एकनाथ शिंदे यांना चकमक घडवून जीवे मारले जाणार होते. मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे एन्काऊंटर घडवून आणण्यात कुणाचा सहभाग होता? याचाही गौप्यस्फोट गायकवाड यांनी केला. (CM Eknath Shinde Group MLA)

संजय गायकवाड म्हणाले, एकनाथ शिंदे यांना दुसरे काहीही दिले जाणार नव्हते, त्यांना मृत्यू दिला जाणार होता. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचे एन्काऊंटर (Encounter) केले जाणार होते. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात (Naxal Gadchiroli) देऊन हत्या घडवून आणण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. मी अत्यंत जबाबदारीने हा गौप्यस्फोट करत आहे. (CM Eknath Shinde Group MLA)

गायकवाड पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती.
या धमकीनंतर राज्य सरकारने एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला.
ही सुरक्षा देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरी बैठक असताना मातोश्रीवरून फोन आला
आणि झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असे सांगण्यात आले. याचा अर्थ काय? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपले होते.
त्यांना नक्षलींच्या हातून मारायचे होते. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना सुरक्षा नाकारली, असा थेट आरोप गायकवाड
यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar Speech In NCP Mahila Melava | महिलांच्या प्रश्नावर शरद पवार आक्रमक, रस्यावर उतरण्याचे आवाहन करत म्हणाले – ‘केसेस टाकल्या तरी…’

Pune Crime News | तडीपार आरोपीला चंदननगर पोलिसांकडून पिस्तुलासह अटक