CM Eknath Shinde | मी इर्शाळवाडीला चिखल तुडवत गेलो, व्हॅनिटी व्हॅन मधून नाही, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडीओ)

इर्शाळवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – आजाराचं कारण देत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं जाईल असं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. या चर्चांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे. माझी तब्येत चांगली आहे. मी ईरशाळवाडीला व्हॅनिटी व्हॅन (Vanity Van) घेवून आलो नव्हतो मी चिखल तुडवत वर गेलो, असा टोला एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांना लगावला. अनेक लोकांची कामे केलीत आणि त्यांचेच आशिर्वाद माझ्या मागे आहेत. त्यामुळे मला काही होणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) आज इर्शाळवाडीचा (Irshalwadi) दुसऱ्यांदा दौरा केला. दरडीखाली गाव गेल्यानंतर इथल्या पुनर्वसनाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. इथल्या लोकांना तातडीनं घरं आणि जीवनावश्यक गोष्टी पुरवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

6 महिन्यात पुनर्वसनाची ग्वाही

येत्या सहा महिन्यात इर्शाळवाडीतील लोकांना त्यांच्या हक्काची घरं देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. दुर्घटना ग्रस्तांसाठी खालापूर भागातील चौक या ठिकाणी तात्पुरता निवारा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या निवारा केंद्राची (Shelter) पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही

इर्शालवाडीतल्या 42 कुटुंबियांच्या घराचा प्रश्न तर सोडवणारच, त्याच बरोबर त्यांचा रोजगार,
शिक्षण, विधवा महिला आणि 22 अनाथ मुलांचाही प्रश्न मार्गी लावला असून
मी शेवट पर्यंत तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. त्याच प्रमाणे जी शिकलेली मुले आहेत त्यांना नोकरी कशी दिली जाईल याचा विचार आहे. नियमाप्रमाणे आपल्या नोकरीचा प्रश्न सोडवला जाईल असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

बचत गटांची स्थापना करणार

काही बचत गट स्थापन करुन महिलांना रोजगार दिला जाईल, पुरुषांनाही रोजगार दिला जाईल.
शेतीच्या जमिनीबाबत प्रशासन योग्य निर्णय घेईल.
रोजगार आणि कायम स्वरुपी घरे लवकरच देण्याचा प्रयत्न आहे. चांगल्या दर्जाची घरे दिली जातील.
त्यासाठी सिडकोला (CIDCO) पाच एकरवर घरे बांधण्याची जबाबदारी सोपवली आहे.
तसेच विधवा महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tejasswi Prakash And Karan Kundrra | तेजस्वी प्रकाशने सांगितले तिने का केले करण कुंद्रासोबतचे नाते सर्वांसमोर जाहीर; “मला ते करण्याशिवाय पर्याय…”

Nagraj Manjule | नागराज मंजुळे आहेत दत्तक पुत्र, खरे नाव देखील आहे वेगळेच; मुलाखतीमध्ये सांगितले सत्य

Ajit Pawar | मला काय करायचंय, राज ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार भडकले