CM Eknath Shinde | पाच लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – येणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अराजपत्रित कर्मचाऱ्यासाठी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्सव अग्रीम देण्यास मान्यता दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या उत्सव अग्रिम (Celebration Advance) देण्यास हिरवा कंदील दाखविला.

 

या निर्णयामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे गट ‘क’ व ‘ब’ या अराजपत्रित (Ungazetted) संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे. उत्सवासाठी कर्मचाऱ्यांना 12,500 रक्कम अग्रीम म्हणून दिली जाणार आहे. यात कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम म्हणून 12,500 रुपये बीनव्याजी दिले जाणार आहेत.

 

तसेच याचा परतावा 10 समान हप्त्यात कर्मचाऱ्यांना करता येणार आहे. यापूर्वी 2018 साली हा अग्रीम देण्यात आला होता.
यामुळे पाच लाख कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. राज्य शासनाकडून अराजपत्रित कर्मचाऱ्यांना अग्रीम म्हणून
दिल्या जाणाऱ्या रकमेचा जास्तीत जास्त वापर दिवाळीच्या काळात खरेदीसाठी केला जातो.
त्यामुळे शासनाला त्यातून महसूल देखील मिळतो.

 

Web Title :- CM Eknath Shinde | maharashtra ekanth shinde government decided to gave advance to non gazette employees for diwali celebration

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sandipan Bhumre | नाराज संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळणार की लटकवणार, मंत्री भुमरे स्पष्टच बोलले…

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Subhash Desai | घोडा मैदान आता लांब नाही, शेलारांच्या टीकेला सुभाष देसाईंचे प्रत्युत्तर