CM Eknath Shinde On Chhagan Bhujbal | CM शिंदेंनी स्पष्ट शब्दात भुजबळांना सुनावले, कुणीही संभ्रम पसरवायची आवश्यकता नाही, ‘सरकार…’

मुंबई : CM Eknath Shinde On Chhagan Bhujbal | ओबीसी (OBC) किंवा अन्य समाजामध्ये कुणीही संभ्रम पसरवायची आवश्यकता नाही. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी समाजावर अन्याय न करता, धक्का न लावता मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना सुनावले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी भुजबळांचे नाव न घेता एकप्रकारे ते ओबीसी आणि मराठा समाजात संभ्रम पसरवत असल्याचेच म्हटले (CM Eknath Shinde On Chhagan Bhujbal) आहे. यावर भुजबळ काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जम्मू कश्मीरमधील कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भुजबळ यांच्या त्या विधानावरून पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी छगन भुजबळांच्या विधानावर थेट नाराजी व्यक्त केली.

छगन भुजबळ यांनी त्यांच्याच सरकारच्या भूमिकेविरोधात जाऊन मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शवला आहे. शिवाय, याविरोधात उभे राहणार असल्याचे म्हणत मराठा समाजाला आव्हान दिले आहे.

भुजबळांच्या या संदर्भातील विधानावर मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने, उर्जा आणि प्रेरणेमुळे महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर होतील. खरे म्हणजे जी बाबच नाही, ओबीसी समाजाचे नेते भेटायला आले होते, तेव्हा माझ्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्या बैठकीला होते.

शिंदे पुढे म्हणाले की, ओबीसी नेत्यांना आम्ही स्पष्ट सांगितले होते की, ओबीसी समाजाला धक्का न लावता किंवा अन्य कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाईल. अशा प्रकारची राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे ओबीसी किंवा अन्य समाजामध्ये कुणीही संभ्रम पसरवायची आवश्यकता नाही. (CM Eknath Shinde On Chhagan Bhujbal)

काय म्हणाले छगन भुजबळ
छगन भुजबळ म्हणाले होते, आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला बोलायला पाहिजे, जर आपण गप्प बसलो
तर आपल्याला कोणीही मदत करायला येणार नाही. त्यामुळे आता थोडी दहशत माजवायची आणि जे पाहिजे करुन घ्यायचे, समोरच्या दरवाज्यातून प्रवेश मिळत नाही म्हणून मागच्या दरवाज्यातून प्रवेश मिळवायचे काम सुरू आहे.

शंभुराज देसाई यांची भुजबळांवर थेट टीका
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) नेते आणि मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai)
छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना म्हटले की, छगन भुजबळ यांची अशी भडक विधाने करायची जुनी सवय आहे.
त्यांना काही वेगळे वाटत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागून घ्यावी, भेटून चर्चा करावी.
ओबीसी आरक्षण काढून दुसऱ्यांना दिलेच जाणार नाही. अशी शक्यताही नाही. मात्र, आपले आरक्षण काढून दुसऱ्यांना
दिले जाणार आहे, असे भासवायचे आणि तुमचे जाणारे आरक्षण मी थांबवले, असे सांगायचे, मोठेपणा घ्यायचा,
असे आता वाटू लागले आहे.

शंभुराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या
प्रयत्नांमुळे मराठा आरक्षणाचा विषय योग्य ट्रॅकवर आहे. छगन भुजबळ यांना वास्तविक ही सगळी परिस्थिती आणि
प्रक्रिया माहिती आहे. तरीही संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हे शंभर टक्के चुकीचे आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, ओबीसींचे नेते आमच्याविरोधात षडयंत्र रचत आहेत, मराठा नेत्यांनी…

Modi Govenment | मोदी सरकारची दिवाळी भेट, सर्वसामान्यांसाठी स्वस्तात ‘भारत आटा’; जाणून घ्या किंमत आणि इतर गोष्टी…

Shree Siddhivinayak Temple Trust | आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार, शिंदे गटातील ‘या’ आमदाराची नियुक्ती