CM Eknath Shinde On New Parliament Building | नवीन संसद भवनाचे उद्घाटन देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : CM Eknath Shinde On New Parliament Building | नवीन संसद भवनाचे (New Sansad Bhavan) उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासिंयासाठी अभिमानाची तसेच सन्मानाची बाब असून, या अभूतपूर्व सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले असल्याची भावना, मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde On New Parliament Building) यांनी व्यक्त केली.

 

देशाच्या राजधानीमध्ये नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्यासह केंद्रीय मंत्रीगण, दोन्ही सभागृहाचे खासदार, राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, उपमुख्यमंत्री, विविध मंत्रालयांचे सचिव, माजी केंद्रीय मंत्री, संसदेचे दोन्ही सभागृहांचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.

नवीन संसदेच्या निर्मितीबाबत बोलताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, आपले प्रखर देशाभिमानी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले आहे, ही देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब आहे. त्यांनी अतिशय ऐतिहासिक अशा वास्तूची संकल्पना मांडली आहे. आज या ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण झाले असून, संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा या नवीन वास्तूमध्ये लोकशाही अधिक बळकट होईल, वृद्धिंगत होईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. आजचा दिवस हा 140 कोटी जनतेसाठी अभिमानाचा दिवस आहे. तसेच मोदींनी विक्रमी वेळेत संसदेचे ऐतिहासिक बांधकाम पूर्ण केले, असे म्हणत, त्यांनी पंतप्रधान मोदींचे यावेळी आभार मानले.

 

संसदेच्या उद्घाटनाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी सर्व धर्म प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी लोकशाही मंदिराचे वातावरण अतिशय भक्तीमय झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळच्या कार्यक्रमात श्री.मोदींनी सेंगोलला साष्टांग दंडवत घातला. नंतर या नव्या इमारतीच्या उभारणीमध्ये हातभार लावलेल्या कामगारांचा गौरव मोदी यांनी केला.

Advt.

नवीन संसदेच्या उदघाटन कार्यक्रमापूर्वी शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140 वी जयंती महाराष्ट्र सदनात साजरी झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र शासनातील मंत्री रावसाहेब दानवे-पाटील (Raosaheb Danve Patil), कपिल पाटील (Kapil Patil) उपस्थित होते.

 

यावेळी खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale), खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde), खासदार उन्मेश पाटील
(MP Unmesh Patil), खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse),
खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil), खासदार धैर्यशील माने (MP Dhairyasheel Mane),
खासदार धनंजय महाडिक (MP Dhananjay Mahadik),खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne), खासदार सदाशिव लोखंडे
(MP Sadashiv Lokhande), खासदार रणजित सिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjeetsinha Naik-Nimbalkar),
खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali), खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane),
खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav), खासदार राजेंद्र गावित (MP Rajendra Gavit) उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर सर्व मान्यवर संसदेच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम स्थळी रवाना झाले.

 

Web Title :  CM Eknath Shinde On New Parliament Building | The inauguration of the
new Parliament building is a matter of honor for the people of the country – Chief Minister Eknath Shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा