CM Eknath Shinde on Thackeray Group Morcha | सगळे दरोडेखोर मुंबईच्या तिजोरीजवळ जमा झाले, ठाकरे गटाच्या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde on Thackeray Group Morcha |  शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) कामातील भ्रष्टाचारावरून महापालिकेवर महामोर्चा काढला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर (BJP) आरोप केले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. आज सगळे दरोडेखोर मुंबई महापालिकेच्या तिजोरीजवळ जमा झाले होते, असे म्हणत शिंदेंनी ठाकरे गटाच्या मोर्चावर हल्लाबोल केला. (CM Eknath Shinde on Thackeray Group Morcha)

 

एकनाथ शिंदे म्हणाले, या लोकांनी गेले 20 ते  25 वर्ष मुंबईची तिजोरी लुटली. मुंबईकरांचे पैसे लुटले आहेत. म्हणून मुंबईकर गेले अनेक वर्ष खड्ड्यांचा प्रवास करत आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. याला जबाबदार सत्ताधारी आहेत. तसेच कोविडमध्ये देखील यांनी पैसे खाल्ले, पैसे कुठे खायचे याचे तरी तारतम्य बाळगले पाहिजे. एकीकडे कोविडमुळे लोक मरत होते आणि दुसरीकडे हे कोविडच्या नावाखाली पैसे कमवत होते, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टिकास्त्र सोडले. (CM Eknath Shinde on Thackeray Group Morcha)

 

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, या लोकांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार केला. जेव्हा चौकशी सुरु झाली त्यानंतर मोर्चा काढत आहेत. मोर्चा कोणाच्या विरोधात काढताय? असा सवाल करत हे पाप तुमचेच आहे, असा टोला शिंदे यांनी लगावला. मुंबईकरांच्या पैशाचा चुराडा तुम्हीच केला आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही मुंबईकरांना सुविधा देत आहोत. चांगल्या काँक्रिकटचे रस्ते, स्वच्छता, बळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (Balasaheb Thackeray Aapla Dawakhana) हे सर्व आम्ही आज मुंबईकरांना देत आहोत म्हणून ही त्यांची पोटदुखी आहे. आजचा मोर्चा म्हणजे चोरच्या उलट्या बोंबा आहेत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचा समाचार घेतला.

 

मोर्चाचं ठिकाण चुकलं

आम्ही महायुतीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढणार होतो. मात्र, बुलढाणा येथे घडलेल्या घटनेनंतर (Buldhana Bus Accident) आम्ही तो मोर्चा स्थगित केला. ज्यांना संवेदना नाहीत, ज्यांना राजकारण करायचंय त्यांना करु द्या. पण, खरंतर आजचा मोर्चा चुकीच्या ठिकाणाहून काढला आहे. हा मोर्चा, मातोश्री एक (Matoshree) ते मातोश्री दोन असा काढायला पाहिजे होता. कारण सगळं तिथंच झालंय ना, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

कोविड काळात मोठा भ्रष्टाचार

सगळं त्यांनाच माहिती आहे, चोराच्या उलट्या बोंबा. ईडीची चौकशी (ED Inquiry)
सुरु झाल्यानंतरच हा मोर्चा काढत आहेत. कोविड काळात सगळं बोगस काम केलंय,
कहर म्हणजे पीपीई कीट, मृतदेहासाठीच्या बॅगची किंमत 600 रुपये असाताना ती 6500 रुपयांना घेतली,
असे सांगत कोविड काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

 

Web Title :  CM Eknath Shinde on Thackeray Group Morcha All the robbers gathered near Mumbai’s treasury,
Chief Minister Eknath Shinde’s criticism of the Thackeray group’s march

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा