Rahul Kanal Join Shivsena | ‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करा’ शिवसेनेत प्रवेश करताच राहुल कनाल यांची मोठी मागणी (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Yuva Sena Chief Aaditya Thackeray) यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे राहुल कनाल यांनी आज शिंदे यांच्या शिवसेनेत (Rahul Kanal Join Shivsena) प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये राहुल कनाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मागील अनेक दिवसांपासून कनाल हे शिवसेनेत (Rahul Kanal Join Shivsena) जाणार असल्याची चर्चा होती. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. राहुल कनाल यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा (Disha Salian Death Case) उल्लेख केला.

 

 

राहुल कनाल म्हणाले, काही लोकांचं म्हणणे आहे की, हे दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी शिंदे गटात (Shinde Group) गेले आहेत. पण हे आरोप माझ्यावर अनेक वेळा केले आहेत. मी आपल्याला विनंती करतो की या प्रकरणाची सर्व चौकशी करण्याचे आदेश द्या. या प्रकरणात कुठेही माझे नाव आलं तर कारवाई करा. या प्रकरणात तपास करण्याची जास्त आवश्यकता आहे. तुम्ही मला जिथे जायला सांगाल तिथे आम्ही जाऊ, असे राहुल कनाल यांनी म्हटले. (Rahul Kanal Join Shivsena)

कोविड (COVID-19) काळात केलेल्या कामाचा दाखला देत राहुल कनाल यांनी एकनाथ शिंदेंचे कैतुक केले. कोविड काळात शिंदे साहेबांच्या सहकार्याने आम्ही खूप काम केलं. पण पक्षातील दोन तीन लोकांनी खूप वाईट राजकारण केलं. काही जण म्हणतात मला पार्टीने खूप काही दिलं आहे, पण मी सांगतो की मी देखील त्याच्या हजार पटीने दिले आहे. आम्ही कोरोना काळात शिंदे साहेबांप्रमाणे सगळ्यांची सेवा केली. कोविडमध्ये केवळ सेवा केली, त्यामुळे मेवाचा आणि माझा काहीही सबंध नाही, असं म्हणत कनाल यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरेंवर निशाणा साधला.

 

 

Web Title :  Rahul Kanal Join Shivsena | rahul kanal mentions disha salian as soon as
thackeray exits the group what exactly did you

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा