CM Eknath Shinde | बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनेनं घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, केलं मोठं कौतुक, शिंदे गटात प्रवेश करणार?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (ShivSena Chief Balasaheb Thackeray) यांचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी (MLA) पक्षात बंडखोरी केली. यानंतर घडलेल्या राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेचे खासदार (MP), आमदार यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला. यावरुन उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या सून (Daughter in Law), सामाजिक कार्यकर्त्या आणि चित्रपट निर्माती स्मिता ठाकरे (Smita Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. बंडानंतर शिंदे यांची भेट घेणाऱ्या ठाकरे कुटुंबातील त्या पहिल्या व्यक्ती आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उचावल्या आहेत.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सून आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांच्या भावजय स्मिता ठाकरे यांचे दीर उद्धव ठाकरे यांच्याशी सख्य नसल्याचे सर्वश्रुत आहे. मागील अनेक वर्षापासून राजकारणापासून दूर असलेल्या स्मिता ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे घराण्यातील एक असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी शिंदे यांना पाठिंबा व्यक्त केला असला, तरी देखील त्यांनी अद्याप एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली नाही. हे पाहता बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेणाऱ्या स्मिता ठाकरे या ठाकरे घराण्यातील पहिल्याच व्यक्ती आहेत.

 

बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत केलेल्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांचा उल्लेख उद्धव ठाकरे व समर्थक गद्दार असा उल्लेख करतात. शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना अडचणीत आली असून पक्षाला पक्ष आणि चिन्हासाठी न्यायालयीन लढाईला सामोरे जावे लागत आहे. अशा पार्श्वभूमीवर स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत आणि उद्धव ठाकरे यांच्यात सख्य नसल्याचे स्पष्ट केलं. तर शिंदे यांच्या कृतीला आपला पाठिंबा असल्याचा संदेश स्मिता ठाकरे देत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

स्मिता ठाकरे म्हणाल्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्मिता ठाकरे म्हणाल्या, आमचे जुने शिवसैनिक आहेत आणि आज ते मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. मी त्यांना खूप वर्षापासून ओळखते. माझ्यासाठी आज ते ज्या खुर्चीवर बसले आहेत त्याचा आदर मी करते. त्यांचे कामही मला माहीत आहे. त्यांनी शिवसेनेत किती कार्य केलेले आहे ते मला माहीत आहे. मी त्यांना आदराने बघते. एकनाथ शिंदे हे आमच्यासाठी जुने कार्यकर्ते आहेत. मी कुटुंबवगैरे पाहिले नाही, तर मी एक व्यक्ती म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले.

 

मी राजकारणात नाही…

शिवसेनेत पडलेल्या दोन गटांवरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर स्मिता ठाकरे यांनी बोलणे टाळले. मी राजकारणात नाही,
मी समाजकार्य करते, त्यामुळे याबाबत मला काही माहित नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आपण कोणत्या गटाला समर्थन करता या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी दिले नाही.

 

Web Title :- CM Eknath Shinde | shivsena balasaheb thackerays daughter in
law smita thackeray met chief minister eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा