Chitra Wagh | ‘काय ते प्रश्न, काय ती उत्तरं, काय ती घरातल्या घरातली मुलाखत, कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी केल्यानंतर पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. आमदार (MLA), पदाधिकारा, कर्यकर्ते एकनाथ शिंदे गटात (Shinde Group) सामील होत असताना शिवसेनेच्या 12 खासदारांचा (MP) गट शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बंडखोरी नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी कंबर कसली आहे तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सामना वृत्तपत्रासाठी उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत (Exclusive Interview) घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर सडेतोड पणे भाष्य केलं. या मुलाखतीवरुन भाजपने (BJP) उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी बोचरी टीका केला आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटच्या माध्यमातून या मुलाखतीवर टीका केली आहे.

 

‘काय ते प्रश्न, काय ती उत्तर, काय ती घरातल्या घरातली मुलाखत, कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के’ असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत काही ट्विट केले आहेत. ‘मागील अडीच वर्षातल्या कर्तृत्वाच्या चार गोष्टी माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या असत्या तर लोकांनाही ऐकायला बऱ्या वाटल्या असत्या… पण तिथे वसूली शिवाय काहीच नव्हतं…’ असं म्हणत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी बोचरी टीका केली.

 

त्यांनी पुढे म्हटले, स्वातंत्र्यवीर सावरकरांना (Savantryan Veer Savarkar) माफीवीर म्हणणाऱ्या आणि
हिंदू आतंकवादाची संकल्पना मांडणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो
हे ही आमचे हिंदुत्व म्हणूनही सांगा ना…, असे देखील चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Chitra Wagh | bjp leader chitra wagh slams shivsena chief uddhav thackeray over interview with mp sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा