CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला येण्यासाठी 250 रुपयांचं वाटप? ऑडिओ क्लिप व्हायरल

पैठण : पोलीसनामा ऑनलाइन – मंत्री संदीपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांच्या मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सभा होणार आहे. या सभेत भुमरे शक्तिप्रदर्शन करणार असून आज होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेकडून (Shivsena) करण्यात आला आहे. दरम्यान भुमरेंच्या कार्यकर्त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio Clip Viral) झाली आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तसेच 250 ते 300 रुपये देऊन महिलांना सभेसाठी आणण्याचे असे देखील व्हायरल क्लीपमध्ये संभाषण आहे.
ही ऑडिओ क्लीप कधीची आहे? आताची आहे की जुनी आहे? याची पुष्टी पोलीसनामा करत नाही.
परंतु मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी ही क्लीप व्हायरल झाल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सोमवारी (दि.12) संभाजीनगर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.
परंतु या सभेला प्रतिसाद मिळणार नाही हे माहित असल्याने संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. लोकांनी सभेला उपस्थित रहावे, म्हणून त्यांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. याच दरम्यान भुमरेंच्या कार्यकर्त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

ऑडिओ क्लिप मधील संभाषण

‘आपण 400 रुपये पण दिले असते पण पैशाचा विषय त्यांच्या हातात आहे.
भाऊ पैसे ते देणार की तुम्ही देणार… नाहीतर तिथे गेल्यावर असं नाही झालं पाहिजे.
पैसे कोण देणार? आपल्याकडे त्यांनी अडीच लाख रुपये पाठवले होते. बरं का… मी सचिनलाही म्हणलं भाऊ… आपल्याकडे नको घेऊ पैसे… नाहीतर अर्धे खाल्ले आणि अर्धे दिले, अशा पद्धतीचा आरोप होतोय… तुम्ही पण करोडपती आहे त्यामुळे पैशाची चिंता नाही तसं…’ असं संभाषण असून ते नेमकं कोणाचे आहे हे समजू शकले नाही.

Web Title :- CM Eknath Shinde | viral phone recording of paying money to gather crowd at cm eknath shinde sabha sandeepan bhumare paithan aurangabad news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | अजित पवार पुन्हा पक्षावर नाराज आहेत का? पत्रकार परिषद घेऊन दिले स्पष्टीकरण

Cabinet Meeting Decision | 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ‘सेवा पंधरावडा” म्हणून साजरा होणार, मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय (व्हिडिओ)

Gold-Silver Rate | पितृपक्षामुळे देशभरात व्यवसायात 10 टक्के घट, सोने-चांदीत सर्वात जास्त घसरण