CM Eknath Shinde |  आम्हालाही तिखट बोलता येईल, आमच्याकडेही खूप काही बोलण्यासारखं आहे, मुख्यमंत्र्याचा उद्धव ठाकरेंना इशारा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाण्यातील जनक्षोप मोर्चाला संबोधित करताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार असं जाहीर आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलं. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, लोकशाहीत कोणाला कुठेही निवडणूक लढवण्याची मुभा असल्याचे त्यांनी सांगितले. ते मुंबईत बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, माझ्या सारख्या लाखो शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, त्यामुळे शिवसेना (Shivsena) मोठी झाली. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांबद्दल बोलण्याची आवश्यकात वाटत नाही, असा टोला एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

काल ठाण्यात नैराश्य पाहायला मिळालं. त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या.
सत्ता गेल्यावर काय परिस्थिती होते, हे त्यांच्या बोलण्यावरुन कळतं.
खरं म्हणजे मला मुख्यमंत्री की गुंडामंत्री, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फडतूस म्हणाले, असे ज्यांच्या काळात किती मोठे कांड झाले, दोन-दोन मंत्री जेलमध्ये गेले, गृहमंत्री जेलमध्ये गेले. गृहखात्याचे धिंडवडे निघाले. कोणी विरोधात बोललं, त्यांना जेलमध्ये टाकले. नारायण राणे (Narayan Rane) यांना जेवणावरुन उठवलं, कंगना रानौतचं (Kangana Ranaut) घर तोडलं, एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी (Rahul Kulkarni) यांना जेलमध्ये टाकलं, केतकी चितळेला (Ketaki Chitale) जेलमध्ये टाकलं, हुनमान चालिसा बोलणाऱ्या नवनीत राणा (MP Navneet Rana), रवी राणा (MLA Ravi Rana) यांना जेलमध्ये टाकलं, किती गुंडगिरी होती, ही गुंडगिरी ते विसरले का? तेव्हा ते मुख्यमंत्री होते, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) आरोपांचा खरपूस समाचार घेतला.

आम्ही असं काही केलं नाही. आम्ही मर्यादा सोडणार नाही, बाळासाहेबांनी आम्हाला संस्कृती शिकवलेली  आहे.
पण काल जे पाहिले हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. देवेंद्र फडणवीस उद्धट ठाकरे किंवा उद्धवस्त ठाकरे म्हणाले नाहीत.
त्यांनी संयम बाळगला. ही संस्कृती आहे, परंपरा आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे.
सहानुभूती मिळवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे हा बिलकुल मिळणार नाही.
आडीच वर्षात त्यांनी काय केलं, सात-आठ महिन्यात आम्ही काय केलं हे जनेला माहिती आहे.
आम्हालाही त्यांच्यापेक्षा तिखट बोलता येतं, पण आम्ही मर्यादा पाळतो.
पण योग्य वेळी सर्व बोलू, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

Web Title :-  CM Eknath Shinde | We too can speak harshly, we too have a lot to say, Chief Minister’s warning to Uddhav Thackeray (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aaditya Thackeray | जाहिर सभेत आदित्य ठाकरेंचं भाकीत, म्हणाले- ‘हे सरकार काही तासांचे’

Devendra Fadnavis | जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस