CM Eknath Shinde | ‘राहूल गांधींना ‘त्या’ जेलमध्ये ठेवलं पाहिजे अन् घाण्याला जुंपलं पाहिजे’, सावरकरांच्या विधानावरुन मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सावरकर हे देशाचा अभिमान आहे. राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये (Andaman Cellular Jail) ठेवलं पाहिजे आणि त्या घाण्याला जुंपलं पाहिजे. मग त्यांना कळेल. आजही ते म्हणाले की माफी मागायला मी सावरकर (Savantrya Veer Savarkar) आहे का? त्यांना याची शिक्षा मिळाली पाहिजे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. सभागृहामध्ये निवेदन देताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या सावरकर विधानावरुन टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, हा कायदा काँग्रेसने केला आहे. त्यानुसार लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि इतर लोकांवर यांची कारवाई झाली. त्यावेळी कोणी निदर्शने केली नाही. त्यावेळी कोणी म्हणाले नाही की लोकशाही धोक्यात आहे. त्यावेळी राहुल गांधी यांनी अध्यादेश फाडला होता. लोकसभेने ती कारवाई केली होती. महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही. रस्त्यावर फिरू देणार नाही. ओबीसी समाजाचा (OBC Community) अवमान केल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध करतो. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचे समर्थन केले आहे.
सावरकरांचा वारंवार अपमान केला
सावरकरांचा वारंवार अपमान राहुल गांधी यांनी केला आहे. आजही राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला.
सावरकर हे फक्त महाराष्ट्र नाही, तर देशाचे दैवत आहेत. त्यांनी देशासाठी मरण यातना भोगल्या आहेत.
त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसल्या आहेत.
राहुल गांधी यांनी फक्त एक दिवस सेल्युलर तुरुंगात राहून यावं आणि एक तास घाण्याला जुंपलं तर त्यांना
त्या यातना कळतील, म्हणून याचा निषेध करावा तितकं कमी आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Web Title :- CM Eknath Shinde | will not tolerate criticism of savarkar chief minister shinde told rahul gandhi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update