‘धनंजय मुंडे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तर आमचे सुरेश धसच काफी हे’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बीड शहरात पोहोचली आहे. बीडमध्ये महाजानदेश यात्रेदरम्यान अनेक गोष्टी घडल्या त्यामुळे आगामी काळात बीड मधील विधानसभा खूपच वादळी ठरणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

राष्ट्रवादीने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जोरदार उत्तर दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले धनंजय मुंडे म्हणतात की मुख्यमंत्री खोटी आकडेवारी सांगतो, माझं मुंडेना आव्हान आहे की त्यांनी एका मंचावर माझ्यासोबत यावं आणि यावरून माझ्याशी डिबेट करावं.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले धनंजय मुंडे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, डीबेटसाठी तुम्हाला माझी आवश्यकता नाहीये, पंकजा ताईंची आवश्यकता नाहीये, प्रीतम ताईंचीही आवश्यकता नाहीये तुम्हाला तर आमचे सुरेश धसच काफी हे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा चांगलाच समाचार घेतला.

तत्पूर्वी बीड मध्ये पोहचताच शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे याही उपस्थित होत्या मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर पंकजा मुंडे यांनी नाव न घेता विनायक मेटेंवर टीका केली त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा मुंडे-मेटे वाद उफाळून येणार असल्याचे चित्र निर्माण झाले.

आरोग्यविषयक वृत्त –