तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव घेणार मागे

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन 

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले असून त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना तसे सांगण्यात आले आहे.  मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे आता उद्या होणाऱ्या महासभेत अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात येईल अशी घोषणा महापौर रंजना भानसी यांनी आज केली आहे.

[amazon_link asins=’B00KGZZ824,B01DEWVZ2C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5533bf3f-acdb-11e8-b701-81c8c9251bb2′]

पुण्यात पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी राबविलेल्या धडाडीने कामगारांसह भाजपचे नेतेही अडचणीत येऊ लागले होते.  त्यात ते असताना ५५० बस खरेदी करणे भाजपसाठी काहीसे अडचणीचे ठरणार असल्याने त्यांना वर्षभरातच येथून उचलून नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती.

९ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या आयुक्तपदाची मुंढे यांनी सुत्रे हाती घेताच ३१ मार्च विशेष अधिसूचना काढून मिळकतीच्या वार्षिक भाडेमुल्यात वाढ केली होती. त्या विरोधात भाजपने शहरात आंदोलन सुरु केले. भाजपने विशेष महासभा बोलावून सरसकट भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंढे यांनी त्याची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना सांगून तोडगा काढण्यास सांगूनही उपयोग झाला नव्हता. मुंढे यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पाठविले असल्याने स्थानिक भाजप पदाधिकाºयांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. शेवटी भाजपने त्यांच्यावर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणला. त्यावर १ सप्टेंबरला चर्चा होणार होती.

तुकाराम मुंढेच्या समर्थनासाठी नाशिककर सोशल मीडियावर एकवटले

नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव

या ठरावानंतर मुंढे नरमले असून त्यांनी मोकळ्या भूखंडावरील करवाढ पूर्णत: रद्द करतानाच नवीन वार्षिक भाडेमुल्य आकारणीत सुमारे तिप्पट वाढ ५० टक्क्यांनी मागे घेतल्याची घोषणा गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचा आदेश दिला आहे.

वीरभद्र सिंह यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल