CM Uddhav Thackeray | PM मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले – ‘मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे, पण मी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबईतील राजभवनात (Raj Bhavan) आले होते. राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये (British Bunke) ‘क्रांती गाथा’ या भूमिगत दालनाचे तसेज ‘जल भूषण’ या नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे देखील उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान हे 200 वर्षापासून सातत्याने प्रकाशित होत असलेल्या ‘मुंबई समाचार’च्या (Mumbai Samachar) द्विशताब्दी महोत्सवात सहभागी झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मला गुजरातीबद्दल (Gujarat) प्रेम नक्कीच आहे असे म्हटले.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आणि होर्मुसजी कामा साहेब (Hormusji Kama) हे आमच्या कुटूंबियांपैकी एक आहेत. पण मी गुजराती समजू शकतो पण बोलू शकत नाही. त्यामुळे उद्यापासून मुंबई समचार सुरु करतो. या कार्यक्रमाबद्दल मला विश्वास बसत नाही. एका वृत्तपत्राला 200 वर्षे होत आहेत. मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये 200 वर्षे गुजराती वर्तमानपत्र (Gujarati Newspaper) यशस्वीपणे वाटचाल करत आहे. गुजराती आणि मराठी महाराष्ट्रात दुधात साखरेप्रमाणे मिळून विरघळून गेलेलो आहोत.

 

आता तिर्थस्थान झाले पाहिजे
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, राज्यपालांना (Governor) मला खास धन्यवाद द्यायचे आहेत. राजभवनमध्ये ब्रिटिशकालीन बंकर सापडल्यानंतर त्याचे रुपांतर त्यांनी तिथे क्रांती गाथाचे दालनात केले. ते आता तिर्थस्थान झाले पाहिजे. वृत्तपत्र चालवणे किती कठिण असते ते मला माहिती आहे. कारण आम्ही सुद्धा वृत्तपत्र चालवत आहोत. वृत्तपत्रात कोण कुठे चुकतंय ते त्यांना दाखवून देणे, पत्रकारांचे कर्तव्य असतं आणि मुंबई समाचार हे कर्तव्य पार पाडत आहे. आज लोकमान्यांच्या केसरी (Kesari) या वृत्तपत्राला देखील 141 वर्षे झाली. याच लोकमान्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा जाब विचारला होता.

‘गुजराती आणि मराठीचे नातं अधिकाधिक दृढ व्हाव
मुंबई समाचार किंवा लोकमान्यांचा केसरी, आचार्य अत्रे (Acharya Atre) यांचे मराठा असो, हे इतिहासाचे साक्षीदार आहेत.
मी मुंबई समाचारला माझ्या शुभेच्छा देतो. आज दोनशे वर्षे पूर्ण झाली आहेत.
यापुढे देखील आणखी शंभर, दोनशे वर्ष या वृत्तपत्राने पत्रकारितेचे कार्य करावे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा.
गुजराती आणि मराठीचे नातं अधिकाधिक दृढ व्हावं ही माझी सदिच्छा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray participated in mumbai pm narendra modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepika Padukone | हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात दाखल

 

LIC चा नवीन Dhan Sanchay सेव्हिंग प्लान लाँच, जाणून घ्या त्याची सविस्तर माहिती

 

Amol Mitkari | ‘अजित पवार उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत याचे भान हवे होते’