CM Uddhav Thackeray | रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच ! CM उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा कोकणातील रिफायनरी प्रकल्पाच्या (Nanar Refinery Project) (नाणार तेलशुद्धीकरण) पार्श्वभूमीवर एक नवी माहिती समोर आली आहे. रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं असल्याची माहिती मिळत आहे. या पत्रामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) रिफायनरीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. अशी माहिती समोर आली आहे.

 

मीडिया रिपोर्टनुसार, नाणार रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे. म्हणून नाणार ऐवजी आता रिफायनरीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) राजापूरच्या बारसू सालेगाव (Barsu Salegaon) आणि पश्चिम भागातील गावातील काही गावांचा समावेश आहे. बारसू रिफायनरीसाठी साधारण 14 हजार एकर जमीन आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दर्शवल्याची माहिती समोर येतेय. तर, रिफायनरी प्रकल्प (Refinery Project) हा रत्नागिरीतच होणार हे जवळपास निश्चित झालं असल्याचं सागितलं जात आहे. (CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रानुसार या प्रकल्पासाठी 13 हजार एकर जमीन राजापूर तालुक्यातील बारसू साठी दिली जाऊ शकणार आहे. त्याचबरोबर नाटे मधील दोन हजार एकर समुद्र किनाऱ्याची जमीन बंदर उभारणीसाठी दिली जाऊ शकते, दरम्यान, महाराष्ट्र सरकारने रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक संकेत दिल्याचं विधान काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Minister Dharmendra Pradhan) यांनी केलं होतं.

 

दरम्यान, ‘सरकार तुम्ही दाद घ्या ना… रिफायनरी राजापूरला द्या ना’, अशी साद घालत महिलांसह राजापूरवासीयांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे ‘धोपेश्‍वर रिफायनरी झालीच पाहिजे’, अशी आग्रही मागणी केली.
यावेळी महिलांनी ठाकरे यांना गुढी भेट देऊन धोपेश्‍वर रिफायनरी प्रकल्पाद्वारे उद्योगाची म्हणजेच राजापूरच्या सर्वांगीण विकासाची गुढी उभारण्याची मागणी केली.
यावेळी ठाकरे यांनीही महिलांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray writes letter to pm modi on refinery project in ratnagiri

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा