CM Uddhav Thackeray Give Promotion | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा काँग्रेसला आणखी एक धक्का, घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आग्रही आहे. हे वेळोवेळी दिसले आहे. मंगळवारी मंत्रालयातील ३१ उपसचिवांना सहसचिव पदावर बढती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Give Promotion) यांनी काँग्रेसला जोराचा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांपैकी २० अधिकारी हे खुल्या प्रवर्गातील आहे. CM Uddhav Thackeray Give Promotion to 31 Deputy Secretary of Mantralaya

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

उपसचिवांच्या पदोन्नतीचा सरकारी निर्णय मंगळवारी सामान्य प्रशासनाने जारी केला.
मंत्रिमंडळ उपसमितीत आरक्षणातील पदोन्नतीबाबत एकमताने निर्णय घेण्याबाबत ठरले असतानाही अधिकाऱ्यांच्या बढतीचा निर्णय झाला .
त्यामुळे काँग्रेस आणखी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर ७ मे ला राज्य सरकारने परिपत्रक काढून पदोन्नतीमधले आरक्षण रद्द केले आणि हा कोटा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे काँग्रेसने याला विरोध केला.
निर्णय रद्द करण्यासाठी काँग्रेसची आग्रही भूमिका होती.
पण १ जूनला सामान्य प्रशासन विभागाने ६७ कक्ष अधिकाऱ्यांना अवर सचिव म्हणून बढती दिली.
त्या पाठोपाठ आता उपसचिवांना पदोन्नती दिली.
त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आघाडीत आणखी बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

modi government cabinet reshuffle | केंद्रीय मंत्रिमंडळात तब्बल 23 जणांच्या समावेशाची शक्यता !

बढती मिळालेले अधिकारी

शुद्धोधन आहेर, अरुणकुमार बेळगुद्री, संजय इंगळे, मंगेश शिंदे, व्यंकटेश भट, बाळासाहेब रासकर, विजय शिंदे, भटू वानखेडे, दत्तात्रय कहार, डॉ. माधव वीर, कैलास बिलोणीकर, रामचंद्र धनावडे, सुग्रीव धपाटे, विजयकुमार लहाने, श्रीराम यादव, सुबराव शिंदे, सूर्यकांत निकम, राहुल कुलकर्णी, कैलास गायकवाड, प्रकाश साबळे, संजय तवरेज, रविंद्र गुरव, जमीर शेख, राजेंद्र पवार, दीपक देसाई, राजेंद्र होळकर, प्रशांत साजणीकर, रविराज फल्ले, मुग्धा धुरी, रोहिणी भालेकर आणि लक्ष्मीकांत ढोके.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! मोदी सरकार देत आहे 4000 रूपये मिळवण्याची संधी, पहा डिटेल