…म्हणून इस्रायलच्या दूतावासानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं केलं मराठीतून अभिनंदन

मुंबई (Mumbai) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मुंबईकरांची (Mumbai) तहान भागवण्यासाठी समुद्रातील पाणी गोड करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचा हा प्रकल्प महत्वाकांक्षी असून सोमवारी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्प अहवालासाठी मुंबई पालिका (Mumbai Municipality) आणि इस्रायलच्या आयडीइटी टेक्नॉलॉजी (Israel IDET Technology) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्रीही उपस्थित होते. मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प हे क्रांतिकारी पाऊल असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी व्यक्त केला. तर या प्रकल्पाबाबत इस्त्रायलने महाराष्ट्राचे कौतुक केले असून मुंबईतील इस्रायलच्या दूतावासाने (Embassy of Israel) मराठीतून ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचं अभिनंदन केलं आहे.

cm uddhav thackeray | the israeli embassy tweeted in marathi and congratulated cm uddhav thackeray

या ट्विट मध्ये असे म्हंटले आहे की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  पाण्याचे, पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला नि:क्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन. जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे’ असं ट्वीट इस्त्रायलच्या दूतावासाकडून (Embassy of Israel) करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकरांना पाण्याचा सातत्याने पाणीपुरवठा होत रहावा यासाठी नवीन स्रोत बदलण्याचा विचार केला जात होता. त्यातूनच समुद्राच्या पाण्याचे गोड पाण्यात रूपांतर करण्याचा प्रस्तव महापालिकेपुढे आला होता. तत्कालीन आयुक्तांनी हा प्रकल्प फीजीबल नाही, असे सांगून तू विचार मागे टाकला होता. दरम्यानच्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi government) आले. त्यानंतर काही महिन्यापूर्वी समुद्राचे पाणी गोड करून त्याचा वापर पिण्यासाठी करण्याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

मनोरी, मालाड येथे उभारण्यात येणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्पाची वैशिष्ट्ये

१) नि:क्षारीकरण प्रकल्पाचा मे २०२२ पर्यंत डीपीआर तर २०२५ मध्ये प्रकल्प सुरु होण्याची अपेक्षा असून याद्वारे मुंबईकरांना २०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळेल. त्याचबरोबर या प्रकल्पचा भविष्यात ४०० दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत विस्तार करण्याची क्षमता असेल.

२) दरवर्षी मुंबईकरांना १५ ते २० टक्के पाणी कपातीस सामोरे जावे लागते या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्णपणे विश्वासार्ह जलस्त्रोताचा विकास

३) मनोरी, मलाड महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. अत्यंत कमी जागेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून या प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे.

Narendra Patil । नरेंद्र पाटील यांचा सवाल, म्हणाले – ‘मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार उदासीन का?’

४) तुलनात्मकदृष्टीने मनोरी येथे पाण्याची गुणवत्ता चांगली असून समुद्राचे पाणी उचलून
नि:क्षारीकरण प्रकल्पात आणण्याकरिता तसेच प्रक्रियेनंतरच्या क्षाराच्या निर्गमनाकरिता खुल्या
समुद्राची उपलब्धता असलेले हे ठिकाण कांदळवन विरहित आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रापासून दूर आहे. ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे त्या ठिकाणापासून मानवी वस्ती, शेत जमीन, मासेमारी जेट्टी ही दूर आहेत. त्यामुळे हि जागा सर्व निकषांवर पात्र ठरणारी आहे.

cm uddhav thackeray | the israeli embassy tweeted in marathi and congratulated cm uddhav thackeray

५) नुकताच करार झाला असून येत्या १० महिन्यात प्रकल्पचा सविस्तर अहवाल येईल. हा प्रकल्प
अहवाल तयार करतांना समुद्रशास्त्रीय सर्वेक्षण, भूपृष्ठीय सर्वेक्षण, भूभौतिकशास्त्रीय सर्वेक्षण,
पर्यावरण निर्धारण अभ्यास (सागरी व जमिनीवरील), डिफ्युजर, खाऱ्या पाण्याच्या निर्गमनाच्या
रचनात्मक बाबींची गणितीक प्रतिकृती, समुद्राच्या पाण्याच्या आदान तसेच क्षाराच्या निर्गमनाचे स्थळ
निश्चित करून संकल्प चित्रे तयार करणे, किनारपट्टी नियमन क्षेत्रीय अभ्यास व तद्अनुषंगिक
परवानग्या प्राप्त करण्याची कामे हाती घेण्यात येतील. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रकल्प
बांधकामाकरिता सविस्तर निविदा प्रक्रिया राबवून पुढील कार्यवाही केली जाईल.

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : cm uddhav thackeray | the israeli embassy tweeted in marathi and congratulated cm uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update