CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंच्या ताफ्यात ‘अज्ञात’ मर्सिडीज कार घुसली, चालकास अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यामध्ये एक अज्ञात कार घुसल्याची माहिती समोर आली आहे. साकिनाका परिसरात महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा थेट ताफा रस्त्याने निघाला होता. त्या दरम्यान, एक अज्ञात मर्सिडीज कार अचानक घुसली. त्यानंतर सुरक्षा ताफ्यात (Security Tafa) गोंधळ उडाला.

ताफ्यात मर्सिडीज कार (Mercedes car) अचानक घुसल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने संबंधित कार ताफ्यातून बाजूला घेत कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान, संबंधित कार चालक एक व्यापारी असल्याची माहिती मिळत आहे. तो कार चालक मलबार हिलच्या दिशेनं जात होता. कानात इअरफोन्स घातलेले असल्याने मुख्यमंत्र्यांचा ताफा जात आहे. हे लक्षात आलं नाही. असं पोलीसाच्या चौकशीत समोर आलं आहे.

दरम्यान, लेन बदलून तो चुकून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आला होता,
अशी माहिती चौकशीच्या वेळी पुढं आलीय.
तर, संबंधित कार चालकावर वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि सुरक्षेत अडथळा आणल्याबद्दलच्या अधिकृत कलमाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आला.
नंतर तात्काळ कार चालकाची जामीनावर सुटकाही झाली आहे.

Web Titel :- CM Uddhav Thackeray | unidentified mercedes car enters cm thackeray convoy driver arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM-Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येतील 4000 रुपये, परंतु 30 सप्टेंबरपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम, जाणून घ्या

SBI नं जारी केला अलर्ट ! 15 सप्टेंबर रोजी 2 तासांसाठी बंद राहणार बँकिंग सेवा, व्यवहारांवर होणार परिणाम, जाणून घ्या वेळ

Bad Habits For Health | जर तुमच्यात सुद्धा असतील ‘या’ 4 वाईट सवयी तर तात्काळ बदला, भविष्यात होऊ शकतो आरोग्याला धोका