CM Yogi Adityanath On Mumbai Visit | ‘योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले अन् ५ लाख कोटींची गुंतवणूक…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath On Mumbai Visit) हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जी – २० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजीत करण्यात आलेल्या रोड शो साठी मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी विविध उद्योगपतींशी संवाद साधून उत्तरप्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याची साद त्यांनी सर्व उद्योगपतींना घातली. त्यावर उद्योगपतींनी त्यांची मागणी मान्य केली असून उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ५ लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे आश्वासन उद्योगपतींनी दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून (CM Yogi Adityanath On Mumbai Visit) देण्यात आली.

येत्या फेब्रुवारी महिन्यात उत्तरप्रदेशमध्ये ग्लोबल इन्वेस्टर्स समीटचे आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये उद्योजकांना सहभागी होण्याचे निमंत्रित देण्यासाठी योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर (CM Yogi Adityanath On Mumbai Visit) आले होते. यावेळी त्यांनी रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासह टाटा सन्स, अदानी समूह, गोदरेज, बिर्ला, पिरामल, वेदांत, पार्ले, हिंदुजा, लोढा आदी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

यादरम्यान रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी उत्तर प्रदेशमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि
हरित ऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन दिले.
त्याचप्रमाणे अदानी समूहाने पीपीपी मॉडेलवर आधारित वैद्यकीय संस्था उभारण्याचे आश्वासन दिल्याची
माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे.
याबरोबरच अदानी समूह नोएडा येथे कौशल्य विकास केंद्र देखील स्थापन करणार असल्याचेही
उत्तर प्रदेश सरकारकडून यावेळी सांगण्यात आले आहे.
त्यामुळे योगी आदित्यनाथांचा मुंबई दौरा उत्तरप्रदेशच्या विकासासाठी अधिक फलदायी ठरल्याचे बोलले जात आहे.

याशिवाय या दौऱ्यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची देखील भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना ‘शिवप्रतिमा’ भेट दिली.

Web Title :- CM Yogi Adityanath On Mumbai Visit | yogi adityanath mumbai visit businessman promises to invest five lakh crore uttar pradesh during

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Beed ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ व एजंट अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Voter News | पुणे जिल्ह्यात 79 लाख 51 हजार 420 मतदार; मतदार संख्येत 74 हजार 470 ची वाढ