CM Yogi Death Threat | CM योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CM Yogi Death Threat | युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना फेसबुक (Facebook) पोस्टद्वारे शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. शिरच्छेद करणार्याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. आदित्यनाथ यांना धमकी आल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. धमकी देण्यात आलेल्या फेसबुक अकाउंटचे नाव आत्मा प्रकाश असले तरी हे अकाऊंट हॅक करून दुसर्याच व्यक्तीने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस विभागासह इंटेलिजन्स युनिट आणि जेडो विभाग सक्रिय झाला आहे. (CM Yogi Death Threat)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मा प्रकाश नावाच्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते, त्यानंतर मुरादाबाद पोलिस नावाचे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. याच पेजवर मुख्यमंत्री योगींना धमकी देण्यात आली. यासंदर्भात मुरादाबाद शहराचे पोलीस अधीक्षक अखिलेश भदौरिया यांनी सांगितले की, सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (CM Yogi Death Threat)
भदौरिया यांनी सांगितले की, पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार ज्या फेसबुक पेजवरून धमकी देण्यात आली आहे, त्याच्या प्रोफाइल पिक्चरवर पाकिस्तानचा झेंडा आहे. अधिक माहितीसाठी फेसबुकला ईमेल पाठवून या पेजबाबत माहिती मागवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमक्या यापूर्वी अनेकदा आली आहे.
एका पिशवीत देखील धमकीचे पत्र सापडले होते. ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बने उडवण्यात येणार असल्याचे म्हटले होते.
तसेच देवेंद्र तिवारी यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. देवेंद्र यांच्या घरातूनच हे धमकीचे पत्र मिळाले आहे.
देवेंद्र यांनी अवैध कत्तलखान्यांविरोधात जनहित याचिका दाखल केली होती.
धमकीची पत्रे मिळाल्याप्रकरणी लखनऊच्या आलमबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
लखनऊ पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.
Web Title :- CM Yogi Death Threat | UP chief minister yogi adityanath got death threat reported in moradabad share on facebook
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Dawood Ibrahim Brother Iqbal Kaskar | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर रुग्णालयात
Nilesh Rane | रिफायनरी प्रकल्पावरून निलेश राणेंचा ताफा; राणे म्हणाले – ‘मी हात जोडून माफी मागतो…’