Coal Scam Case | कोळसा घोटाळा प्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डांना 4 वर्षाची शिक्षा, दिल्ली विशेष न्यायालयाचा निकाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Coal Scam Case | राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Former Rajya Sabha MP Vijay Darda) यांना कोळसा घोटाळा प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्ली विशेष न्यायालयाने (Delhi Special Court) विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणात (Coal Scam Case) चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा (Imprisonment) सुनावली आहे. विजय दर्डा, मुलगा देवेंद्र दर्डा (Son Devendra Darda) यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.

जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. चे (JLD Yavatmal Energy Pvt Ltd) संचालक मनोजकुमार जयस्वाल (Director Manoj Kumar Jayaswal) यांनाही छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कोळसा खाण वाटपातील अनिमयमिततेच्या प्रकरणात चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोळसा घोटाळा प्रकरणात (Coal Scam Case) निवृत्त कोळसा सचिव एच.सी. गुप्ता (ex-Coal Secretary H C Gupta), दोन ज्येष्ठ अधिकारी केएस क्रोफा (KS Krofa) आणि केसी समरीया (KS Samaria) यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

विजय दर्डा काँग्रेसकडून (Congress) राज्यसभेवर खासदार होते.
गेल्या पाच दशकांपासून दर्डा कुटुंब राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रिय आहे.
त्यामुळे आजच्या निकालानं दर्डा कुटुंबियांसमोरची आव्हानं नक्कीच वाढली आहे.
न्यायालयाने विजय दर्डा आणि इतरांना कलम 120 बी,
420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mugdha Godse | करोडो रुपयांची मालकीण कमावत होती दिवसाला फक्त 100 रुपये;
अभिनेत्री मुग्धा गोडसेचा प्रेरणादायी प्रवास