उत्तर महाराष्ट्र, कच्छ गारठला !

मुंबई : एका बाजूला पूर्व बिहार ते मराठवाडा दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असतानाच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने उत्तर महाराष्ट्र, कच्छ, सौराष्ट्राचा परिसर गारठला आहे. येत्या दोन दिवसात पारा आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कच्छमधील नालिया येथे सर्वात कमी ४.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर कांडला विमानतळ येथे ७.६, भुज १०.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.

महाराष्ट्रातील जळगाव येथे १० अंश सेल्सिअस, नाशिक १०.४, मालेगाव १२.२, पुणे १३.६, सातारा १५.५, ठाणे १८.६, सातांक्रुझ १६.४, डहाणु १८.२, अकोला १५.५, अमरावती १६.३, बुलढाणा १५, गडचिरोली १७.८, गोंदिया १४.५, नागपूर १५.२, वर्धा १५.४, वाशिम १६.२, यवतमाळ १४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. मध्य प्रदेशातील धार ७, ग्वाल्हेर ८़५, गुना ७़१, खांडवा ११़४, पंचमढी ६़४, इंदौर १०, रतलाम ८़६ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे़