Lockdown : अत्यावश्यक सेवा उद्योगासाठी समन्वयक अधिकार्‍यांची नियुक्ती

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये पुणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा व औद्योगिक क्षेत्राकरिता आवश्यक परवानग्या देण्यात येणार आहेत. या परवानग्या देण्यासाठी समन्वयक अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

समन्वय समितीमधील अधिकार्‍याचे नाव, मोबाईल क्रमांक व जबाबदारी पुढीलप्रमाणे.

१ ) सदाशिव सुरवसे, सहसंचालक (उद्योग) (मो.क्र. ९९२३९१११९६) – शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे अत्यावश्यक सेवेचे उद्योग सुरु ठेवण्यासाठी समन्वयक, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना माहिती सादर करणे.

२) अविनाश हदगल, उपजिल्हाधिकारी, एमआयडीसी (७०२८४२५२५६) – अत्यावश्यक उद्योगांना परवानग्या देणे.

क्षेत्र व्यवस्थापक काळे (८९७५००३९६९) यांच्याकडे पिंपरी-चिंचवड, भोसरी आणि आकुर्डी, क्षेत्र व्यवस्थापक भिडे यांच्याकडे (८२७५३७८४५९) बारामती व पंदरे, क्षेत्र व्यवस्थापक हसरमनी (९८२२९७३००६) यांच्याकडे चाकण-१,२,३ व ४, क्षेत्र व्यवस्थापक घाटे (९९७५१४८८७२) यांच्याकडे रांजणगाव व तळेगाव या भागाची सोपविण्यात आली आहे.

३ )  संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी, एमआयडीसी (९५९४६१२४४४) – अत्यावश्यक उद्योगांना परवानग्या देणे. क्षेत्र व्यवस्थापक जाधव (९८५०५६१३३८) यांच्याकडे जेजुरी, कुरकंभ, इंदापूर, भिगवण व पाटस तसेच क्षेत्र व्यवस्थापक रासणे (८१०८९०८२९६) यांच्याकडे तळवडे, खराडी, हिंजवडी व खेड सेज या भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जिल्हा उद्योग समितीचे व्यवस्थापक रेंधाळकर (९८२२२८५५१८), निरीक्षक उद्योग यशवंत गायकवाड (९४०४६७६६६७) आणि निरीक्षक उद्योग मनिषा गायकवाड (९९२३१९९६३३) यांच्याकडे वरील क्षेत्राव्यतिरिक्त इतर सर्व क्षेत्राकरीता सर्व अत्यावश्यक उद्योगांसाठी परवानगी देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी आदेशात नमूद केले आहे.