तुम्हाला माहिती आहेत का, आरोग्याचे ‘हे’ 5 रंग, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जीवनात रंगांचे खुप महत्व आहे, जे प्रत्येकाला माहित आहे. प्रत्येक रंगाचे आपले वेगळे महत्व आहे. या रंगांचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. परंतु, हे तुम्हाला माहित आहे का, की या रंगांचा प्रभाव आपल्या आरोग्यावरही पडतो. प्रत्येक रंगाचे फळ आणि भाज्यांमधील पोषकतत्व आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. जाणून घेवूयात पाच रंग जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत.

हे आहेत ते 5 रंग

1. लाल रंग
लाल रंग धाडस आणि उर्जेचा प्रतीक आहे आणि तुमच्या आरोग्याच्या बाबतीतही त्याचा तसाच परिणाम आहे. लाल रंगाची फळे आणि भाज्यांमध्ये लायकोपिन आणि एंथेसायनिन असते, जे कँसरची शक्यता कमी करण्यासह स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात. हे शरीराला आवश्यक उर्जाही देतात. ताजेतवाने करतात. यासाठी आपल्या आहारात टोमॅटो, गाजर, बीट, शिमला मिरची, स्ट्रॉबेरी, टरबूज, सफरचंद, चेरी, आलूबुखार इत्यादीचा समावेश करावा.

2. हिरवा रंग
हिरवा रंग हिरवळ आणि भरभराट, आंनदाचे प्रतिक आहे. तो प्रकृतीला हिरवेगार ठेवतो. हिरव्या रंगाच्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये सल्फोराफिन, आयसोथायोसिन, इन्डोल, ल्यूटिनसारखी तत्व आढळतात, जी दात आणि हाडे मजबूत करतात. यामध्ये व्हिटामिन ए आणि सी शिवाय बी कॉम्प्लेक्ससुद्धा भरपूर मात्रेत आढळते. यामध्ये भरपूर कॅश्लियम असते. यासाठी हिरव्या पालेभाज्या, काकडी, बीन्स, ब्रोकालीसह, हिरवी द्राक्षे, सफरचंद, जाम आणि नाशपतीचा वापर आहारात करावा.

3. पिवळा रंग
पिवळ्या रंगाची फळे आणि भाज्या जसे पपई, संत्री, अननस, सिमला मिरची, मका, मोहरी, भोपळा, लिंबू, पीच, आंबा, खरबूज इत्यादी आहारात घेऊन तुम्ही अल्फा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन, बायोफ्लॅवेनॉइड्स, व्हिटामिन-सी शरीरासाठी मिळवू शकतो.

यामुळे त्वचा तरूण होते, रोगप्रतिकारकशक्ती वाढते. याशिवाय हृदयरोग आणि फुफ्फुसाचे आजार दूर राहतात. यामुळे डोळ्यांच्या समस्याही दूर होतात.

4. सफेद रंग
सफेद रंगाच्या भाज्या आणि फळे आहारात समाविष्ट केल्यास कॅन्सर आणि ट्यूमरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो. याशिवाय हृदय निरोगी राखण्यासोबत फॅट नियंत्रित ठेवण्याचे काम हे करते. यामध्ये एलीसीन आणि फ्लॅवेनॉइड भरपूर प्रमाणात असते. सफेद रंगाचा डाएटमध्ये समावेश करण्यासाठी केळे, मुळा, बटाटा, कोबी, लसूण, कांदा, नारळ, मशरूम इत्यादीचा वापर करू शकता.

5. निळा रंग
अँथोसायनिन भरपूर असलेल्या निळ्या रंगाच्या किंवा जांभळ्या रंगाच्या भाज्या आणि फळे सेवन केल्यास त्वचा निरोगी राहते. हृदयरोग दूर राहतात. कँसरची शक्यता कमी होते. यासाठी तुम्ही आहारात जांभूळ, काळी द्राक्ष, आलू बुखार, ब्लॅकबेरी, वांगी आणि या रंगाच्या पालेभाज्या खाऊ शकता.