‘कॉमेडियन’ कपिल शर्मानं विचारलं देवाची खरी संकल्पना काय आहे ? श्री श्री रवीशंकर यांनी दिलं ‘हे’ उत्तर

पोलिसनामा ऑनलाइन –कॉमेडी किंग कपिल शर्मा गुरुवारी(दि 7 मे) ट्विटरवर अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांच्यासोबत लाईव्ह होता. हार्ट टु हार्ट नावाच्या या लाईव्ह सेशनमध्ये कपिल शर्मानं अनेक मजेदार आणि गंभीर प्रश्न विचारले. यातच कपिलनं एक प्रश्न असा विचारलं की, देवाची खरी कन्सेप्ट काय आहे. देव काय आहे असं त्याला म्हणायचं आहे.

खरा देव कशात आहे ?

कपिल शर्मानं रवीशंकर यांना विचारलं की, कोणी म्हणतं मंदिरात जाऊन पूजा करायला हवी. कोणी म्हणतं मस्जिदमध्ये जा, कोणी म्हणतं गुरुद्वारा-चर्चा मध्ये जा. कोणं म्हणतं निसर्गच देव आहे. सगळीकडे देव आहे. खरं देव कोण आहे ? यावर रवीशंकर म्हणाले, “ईश्वर प्रेम आहे जो तुमच्या हृदयात आहे. सर्व प्रकारात देवच आहे. लोक म्हणतात देव दिसत नाही. म्हणतो की देवाशिवाय काहीच नाही.”

कुठे गेला तो आनंद ?

कपिलनं विचारलं की, आनंद काय आहे. लहानपणी 2 रुपयांच्या चॅटमध्ये जो आनंद मिळायचा तो महागड्या गाडीतही मिळत नाही. तो आनंद कुठे गेला गुरुदेव ? यावर बोलताना रवीशंकर म्हणाले, “आनंद ना 2 रुपयांच्या चॅटमध्ये आहे आणि ना ही 2 कोटीच्या गाडीत. आनंद तुमच्या आतच आहे. घेतल्यावर जो आनंद मिळतो तो मर्यादित आहे. परंतु दिल्यावर जो आनंद मिळतो तो अमर्यादित आहे. तुम्हला जो आनंद हवा आहे तो तुमच्या आतच आहे.”